CM Eknath Shinde Sakal
मुंबई

उल्हास नदीवरील धरणामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका? CM शिंदेंच्या कॉलनंतर प्रशासन Active Mode वर

Mumabi Monsoon: धरणाची उंची कमी करण्यासाठी रेल्वेकडून आठ स्मरणपत्रे; महालक्ष्मी एक्स्प्रेसची पुनरावृत्ती होण्याचा धोका

सकाळ वृत्तसेवा

नितीन बिनेकर

मुंबई : उल्हास नदीवरील नवीन बांधलेल्या धरणामुळे पावसाळ्यात महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणाची उंची कमी करण्याची मागणी मध्य रेल्वेकडून गेल्या दोन वर्षांपासून केली जात आहे. मात्र, रेल्वेच्या या पत्रव्यवहाराला राज्य शासनाकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी मुख्यमंत्र्यांना या पत्राची दखल घ्यावी लागल्याची माहिती समोर आली आहे. Mumbai Railway Latest Update

उल्हास नदी लांबीच्या दृष्टीने कोकणातील सर्वात मोठी नदी आहे. लोणावळ्याजवळ राजमाची परिसरात तिचा उगम होतो. पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून ती १२२ किलोमीटरचे अंतर पार करून कल्याणजवळ खाडीतून पुढे वसईच्या खाडीला मिळते. उल्हास नदी आणि तिच्या खाडीच्या काठावर कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, ठाणे अशी शहरे आणि नेरळ, पाषाणे, वांगणीसारखी गावे वसली आहेत. २६ जुलै २००५ च्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला महापूर आला होता. त्यावेळी बदलापूरजवळ ब्रिटिशकालीन बॅरेजचे (छोटं धरण) लोखंडी दरवाजेही वाहून गेले होते. बदलापूर ते कल्याण परिसरात त्यावेळी प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर २०१९ च्या पावसाळ्यातसुद्धा उल्हास नदीला पूर आलेला होता. या पुरात महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती. यामध्ये ७०० प्रवासी या पुरातून बचावले. आता राज्य शासनाने ब्रिटिशकालीन धरणाच्या जागी नवीन छोटे धरण उभारले आहे; परंतु या धरणाला दरवाजे नाहीत. तसेच धरणाची उंची जुन्या धरणापेक्षा जास्त आहे. या धरणाच्या काही अंतरावरून रेल्वेच्या मार्गिका जातात. त्यामुळे पावसाळ्यात पूर परिस्थितीत धरणामुळे रेल्वे गाड्यांना धोका उद्भवू शकतो.


‘धरणाची उंची कमी करा’
नव्याने बांधण्यात आलेल्या छोट्या धरणाच्या काही अंतरावरून रेल्वे मार्गिका जातात. साधारण या मार्गावरून दररोज १०० पेक्षा जास्त मेल-एक्स्प्रेस आणि ४० मालगाड्यांची ये-जा होते. त्यामुळे पावसाळ्यात प्रवासी सुरक्षा आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसू नये म्हणून धरणाची उंची कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने ४ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हाधिकाऱ्यांना आणि राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविले होते; परंतु आजतागायत राज्य शासनाकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. २०२२ पासून आजपर्यंत मध्य रेल्वेने एकूण ८ पत्रे पाठविली; परंतु राज्य शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही.

तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश
धरणामुळे रेल्वेला असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून यासंदर्भात तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आता उंची कमी करण्यासाठी आराखडा तयार करणे सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

रेल्वेमार्ग पाण्याखाली
२०१९ मध्ये उल्हास नदीला पूर आल्यामुळे रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले होते. यात कोल्हापूरला जात असलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी दरम्यान अडकली होती. या गाडीमध्ये पाणी शिरले होते. यामध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ‘एनडीआरएफ’, नौदलाला पाचारण करावे लागले होते. यावेळी बोटी, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. हे बचावकार्य तब्बल १० तासांहून अधिक काळ चालले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT