Mumbai Accident sakal
मुंबई

Mumbai Accident: चिंचोटी-भिवंडी रस्त्यावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेत एक ठार

CD

Mumbai Accident News: वसई तालुक्यातील धोकादायक असलेल्या चिंचोटी-भिवंडी रस्त्यावर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. कोल्ही येथे राहणारा राहुल कुमार (वय १८) सोमवारी (ता. २४) सकाळी कामावर जाण्यासाठी चिंचोटी-भिवंडी रस्त्यावरून पायी निघाला होता.

भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव टेम्पोने रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात पुढे चालत असलेल्या राहुल कुमार याला पाठीमागून धडक देत चिरडले. या अपघातात राहुल याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, चिंचोटी-भिवंडी या रस्त्यासाठी या परिसरातील नागरिकांनी अनेक आंदोलने केली आहेत.

मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी अपघाती मृत्यू होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यातच या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे, पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती केली जात नसल्याने खड्डेमय रस्त्यात वारंवार अपघात होऊन नाहक बळी जात आहेत.

पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना या खड्याचा अंदाज येत नसल्याने अपघातांमध्ये वाढ झाली असून याप्रकरणी माजी सरंपच दिनेश म्हात्रे, रमेश जाधव, रविंद्र म्हात्रे, पुष्पा जाधव यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja: मांजरेकरांनी पुन्हा जडेजाच्या बॅटिंगवर केली पोस्ट, यावेळी काय म्हटलंय? वाचा

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT