मुंबई

लोकहितवादी बोले पुरस्कारांचे वितरण

CD

लोकहितवादी बोले पुरस्कारांचे वितरण

मालाड, ता. २ (बातमीदार) : कामगारनेते लोकहितवादी रावबहाद्दूर सी. के. बोले यांची व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने विविध क्षेत्रांतील व्यक्तींना नुकतेच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कला, सामाजिक कार्य, विज्ञान, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, पर्यावरण, क्रीडा, नागरिक सेवा, पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी समाजभूषण पुरस्कार जय साटेलकर (वैद्यक), सुनील शेळके (चित्रपट), अमोल मडामे (व्यसन मुक्ती), प्रभाकर वाईरकर (व्यंगचित्रकारिता), मिलिंद आरोलकर (पत्रकारिता), प्रेमरत्न चौकेकर (पत्रकारिता) तर समाजरत्न पुरस्कार-सत्यवान रेडकर (शैक्षणिक क्षेत्र), कोकणरत्न पुरस्कार सत्यजित चव्हाण (पर्यावरण), कलाभूषण पुरस्कार- अजय फणसेकर (कला क्षेत्र), सहकार व उद्योगरत्न- चंद्रकांत बी. जगताप (सहकार भूषण), अनिल काशीराम मिठबावकर (उद्योगरत्न), भरत निचिते (ओबीसी योद्धा पुरस्कार), समीर वर्तक (पर्यावरण रक्षक पुरस्कार), मोहम्मद अयुब हनीफ कुरेशी (ओबीसीरत्न), अलका नाईक (साहित्यरत्न पुरस्कार), निसार अली सफरदर सय्यद (झुंझार पत्रकार); तर शंकर लोके यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी सी. के. बोले यांच्या कार्यावर ज्ञानेश महाराव व प्रा. विजय मोहिते यांनी प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी मुंडये व युरेका वाईनकर यांनी केले.

MUM24E57253

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT