मुंबई

जमिनीच्या वादातून रिक्षाचालकाची हत्या

CD

जमिनीच्या वादातून रिक्षाचालकाची हत्या
भिवंडी, ता.२ (बातमीदार) : जमिनीच्या वादातून दोन भावांनी आपसात संगनमत करून रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
शांतीनगर पोलिसांनी याप्रकरणी दोघा भावांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. राकेश शंकर वनगुंटी (वय ३९) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे, तर राजेश पुंडलीक जामदार व प्रभुलींग पुंडलीक जामदार, अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश हा कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील रहिवासी असून त्याची पत्नी व दोन मुले मूळगावी आहेत. राकेश सद्यस्थितीत भिवंडीतील कोंबडपाड्यातील सांबरे चाळीत राहत असून तो उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवत होता. त्याची आई सुमित्रा वनगुंटी हिच्या नावावर रामनगर येथील शंकर मंदिराजवळ एक मोकळी जमीन आहे. त्या मोकळ्या जागेवर आरोपींनी माती व विटांचा कचरा टाकला होता. यावरून राकेश व जामदार भावांमध्ये वाद सुरू होते. राकेशने हा विटांचा कचरा २३ जून रोजी आरोपींना काढण्यास सांगितला असता या गोष्टीचा राग मनात धरून राजेश आणि प्रभुलींग या दोघांनी राकेशला लोखंडी रॉडने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. जखमी राकेशवर येथील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमी राकेशची २९ जून रोजी प्रकृती खलावल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी कळवा येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्याचे सांगितले, मात्र राकेशला रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

दोघा भावांना अटक
शांतीनगर पोलिसांनी राकेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात पाठवला असून याप्रकरणी राकेशची बहीण निशा वनगुंटी हिच्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलिस ठाण्यात राजेश आणि प्रभुलींग या दोघा भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT