मुंबई

ठाणे पालिकेची अजब फलकबाजी

CD

ठाणे पालिकेची अजब फलकबाजी


सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २ : पालिका क्षेत्रातील सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडत असून या साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करताना अडचणी येत असून अनेकदा पाणी वाहते असते. अशा वेळी नागरिकांना त्रास होवू नये, काय काळजी घ्यावी, याची माहिती देणारे फलक पालिकेकडून लावण्यात आले आहेत. यामध्ये अधिकचे पाणी साचल्यास नजीकच्या दोरखंडाचा वापर करून मार्गक्रमण करावे, असे त्यावर लिहिले आहे. मात्र, ज्या ठिकाणी हा फलक लावला आहे. त्या ठिकाणी कोणताही दोरखंड नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेच्या या अजब फलकाची चर्चा रंगू लागली आहे.
पावसाळ्यात शहरातील विविध भागात पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. पावसाळ्यात ज्या-ज्या ठिकाणी पाणी तुंबणार आहे, त्या ठिकाणी महापालिकेने फलक लावले आहेत. या फलकावर धोक्याची सूचना असे लिहिण्यात आले आहे. त्याखाली अतिवृष्टीच्या काळात सदर ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. कृपया सदर ठिकाणी येण्याचे टाळावे किंवा नजीकच्या दोरखंडाचा वापर करून मार्गक्रमण करावे, असेदेखील लिहिले आहे. मात्र, त्या ठिकाणी कोणत्याही दोरखंडाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. जर एखाद्या वेळेस या ठिकाणी पाणी साचले, तर दोरखंड शोधायचा कुठे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT