मुंबई

लग्नास नकार दिल्याने प्रेयसीची आत्महत्या

CD

लग्नास नकार दिल्याने प्रेयसीची आत्महत्या

पनवेल, ता. २ (वार्ताहर) : नाशिक येथे राहणाऱ्या तरुणाने पनवेल येथील २७ वर्षीय तरुणीसोबत गेली नऊ वर्षे प्रेमसंबंधातून शारीरिक संबंध ठेवत अचानकपणे लग्न करण्यास नकार दिल्याने या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विजय प्रकाश गोरे (वय २८) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
आरोपी विजय गोरे व मृत तरुणीचे २०१६ पासून प्रेमसंबध होते. यादरम्यान विजयने या तरुणीला लग्नाच्या भूलथापा देत तिच्यासोबत अनेक वेळा शरीरसंबंध प्रस्थापित केले. २०२० मध्ये दोघेही लग्न करणार असल्याचे तरुणीने आपल्या आई-वडिलांना सांगितले होते, मात्र गेल्या मेमध्ये विजयने त्याच्या आई-वडिलांचा या लग्नास विरोध असल्याचे सांगत या तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर या तरुणीने पनवेल शहर पोलिस ठाण्यात विजयविरोधात तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी विजयला चौकशीसाठी बोलावून घेतले होते, मात्र तो पोलिस ठाण्यात हजर झाला नाही. त्यानंतर पीडिता मानसिक तणावाखाली गेली.
याच तणावातून या तरुणीने २३ जून रोजी दुपारी घरामध्ये कुणीही नसताना बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पीडीतेने आत्महत्येपूर्वी आपल्या दोन बहिणींसाठी, तसेच आरोपी विजय गोरे याच्यासाठी अशा तीन चिठ्ठ्या लिहून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT