मुंबई

धरण क्षेत्रात पावसाच्या हलक्या सरी

CD

आणखी पाणीकपात नाही ः डॉ. गगराणी
साठ्यात हळुवार वाढ सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात हलका पाऊस सुरू आहे. पाण्याच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. १५ दिवसांपूर्वी ७० हजार दशलक्ष लिटरवर आलेला पाणीसाठा आज (ता. २) एक लाख तीन हजार ५०३ दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे. ‘जुलै महिन्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याने आणखी पाणीकपात करण्याबाबत कोणताही निर्णय नाही, असे मुंबई महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी सांगितले.
तलाव क्षेत्रात अधूनमधून पाऊस पडत असल्याने आज (ता. २) सातही धरणांत ७.१५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी ७० हजार दशलक्ष लिटरवर आलेला पाणीसाठा २ जुलैला एक लाख तीन हजार ५०३ दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे. धरण क्षेत्रात पावसाची दमदार इनिंग सुरू राहिली, तर लवकरच मुंबईकरांची १० टक्के पाणीकपातीतून सुटका होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाकडून व्यक्त करण्यात आला. त्यात आता आयुक्तांनी आणखी कपातीचा विचार नसल्याचे सांगितले. धरणातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाल्याने मुंबईत ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. भातसा धरणातून एक लाख ३७ हजार दशलक्ष लिटर; तर अप्पर वैतरणातून ९१ हजार १३० दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा राज्य सरकारने उपलब्ध केला आहे. राखीव पाणीसाठा वापरास सुरुवात करण्यात आली आहे. राखीव पाणीसाठा आणि पालिकेच्या अखत्यारीत असलेला पाणीसाठा पुढील २५ दिवस मुंबईची तहान भागवेल इतका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT