मुंबई

लाख लोकांमागे १८ रुग्णवाहिका

CD

लाख लोकांमागे १८ रुग्णवाहिका
अपघातग्रस्तांचा वेळेत उपचारांअभावी मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : देशभरात दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाख लोक जीव गमावतात. अनेकदा जखमींना रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने वेळेत उपचार मिळत नाहीत. राज्यात रुग्णवाहिकेची अनुपलब्धता ही चिंतेची बाब असून एक लाख लोकांमागे केवळ १८ रुग्णवाहिकाच असल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून ही विदारक स्थिती उघड झाली आहे.
देशात दरवर्षी साडेचार लाख रस्ते अपघात होतात. मोठ्या प्रमाणावरील रस्ते अपघातांमुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवेची गरज असताना याबाबतची परिस्थिती चिंताजनक आहे. दशकभरापासून राज्यात रस्ते अपघातातील जखमींना वेळेवर उपचार न मिळाल्याने होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढत आहे. रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णालयात पोहोचवता यावे, यासाठी रुग्णवाहिका अपुऱ्या आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. या निधनाच्या पार्श्वभूमीवर गाडीच्या चालकाच्या म्हणण्यानुसार वेळेवर मदत मिळाली नव्हती. 

वर्ष - अपघात - मृत्यू -   
२०१९ -३२,९२५ - १२,७८८
२०२० - २४,९७१ - ११,५६९
२०२१ - २९,४७७ - १३,५२८
२०२२ - ३३,३८२ - १५,२२४
२०२३- ३५,२४३ - १५,३६६
----
वर्ष - रुग्णवाहिका - प्रतिलाख  रुग्णवाहिका  

१९७१ - ४४१ - ०.९
१९८१ - ९२५ - १.५
१९९१ - २,२३३ - २.८
२००१ - ४,०२५ - ४.४
२०११ - ९६०० - ८.५
२०२१ - १७,३६२ - १४
२०२३ - २१,३३४ - १७
२०२४ - २२, ५०६ - १८
......
-++++
एखादा अपघात घडल्यानंतर त्या ठिकाणापासून रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी रुग्णवाहिका महत्त्वाची आहे. वेळेत उपचार मिळाल्यास रस्ते अपघातातील ५० टक्के मृत्यू कमी होतील. त्यामुळे पुरेशा रुग्णवाहिका असणे आवश्यक आहे.
- अजय गोवले, रस्ते अपघात अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT