मुंबई

अनधिकृत हॉटेल व बियरबारवर कारवाई

CD

भिवंडी, ता. ३ (बातमीदार) : शहरात अनधिकृत बियर बार, लॉज, हुक्का पार्लर, पब आणि अमली पदार्थ विक्री करणारे अवैध बांधकाम निष्कासित करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. त्यानंतर आता भिवंडी महापालिकेच्या परवाना विभागाला जाग आली आहे. त्यांनी पालिका क्षेत्रात असलेल्या अनेक अनधिकृत बार आणि रेस्टॉरंट, देशी बार याच्यावर आयुक्तांच्या आदेशानुसार परवाना विभाग आणि अग्निशमन विभागाने संयुक्त कारवाई सुरू केली आहे.

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी व्यवसाय परवाना आणि अग्निशमन दाखला घेणे अनिवार्य आहे; मात्र आजतागायत ३५ बार आणि रेस्टॉरंट, देशी बार २० अनधिकृत हॉटेल यांनी हे परवाना घेतले नसल्याचे आढळून आले आहे. या सर्व आस्थापनांना रवाना विभाग, अग्निशमन अधिकारी यांच्या पथकाने नोटीस देऊन कारवाई केली. शहरात अजूनही अशा प्रकारे बिगर परवान्यांची आस्थापने रात्रंदिवस सुरू आहेत. त्यांच्यावर निरंतर कारवाई चालू ठेवणार आहे. पालिकेकडून जर परवाने नाही घेतले, तर बार आणि रेस्टॉरंट आणि देशी बार बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT