मुंबई

विधानसभेतही ‘मविआ’चे सरकार आणा : रमेश चेन्नीथला

CD

विधानसभेतही ‘मविआ’चे सरकार आणा : रमेश चेन्नीथला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : काँग्रेस पक्ष हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व समाज घटकाला प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी प्रयत्न केला जाईल. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आता विधानसभा निवडणुकीतही जिल्हा, तालुका, बुथस्तरावर असेच काम करा आणि राज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार हटवून महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज येथे केले.
लोकसभा निवडणुकीत यशानंतर राज्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सेल व विभागाकडून दादरच्या शिवाजी मंदिर येथे करण्यात आला. यावेळी चेन्नीथला बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसच्या विजयात पक्षाच्या विविध सेल व विभागाचे कार्य महत्त्वाचे ठरले आहे. या सर्वांनी राज्यातील गावागावात जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवण्याचे काम केले. तसेच, काँग्रेसच्या पाच न्याय २५ गॅरंटीचे न्यायपत्र घरोघरी पोहचवण्याचे काम केले आहे. लोकसभेच्या विजयानंतर आता विधानसभा निवडणुकीतही असेच काम करून विजयी पताका फडकवा, असे आवाहन पटोले यांनी केले. या कार्यक्रमाला एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय समन्वयक के. राजू, एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोटिया यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस संघटन व प्रशासन प्रमोद मोरे, प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी विविध सेल व विभागाच्या प्रमुखांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT