मुंबई

प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या बस धूळखात

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी एकीकडे केडीएमसी प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे; मात्र दुसरीकडे प्रशासनाची वाहनेच या प्रदूषणाला हातभार लावत असल्याचे चित्र आहे. वायुप्रदूषण कमी करण्यासाठी केडीएमटी प्रशासनाने इलेक्ट्रिक बस आणल्या; मात्र या बस मागील अनेक महिने आगारात धूळखात पडल्या आहेत. तर दुसरीकडे वायुप्रदूषण करणाऱ्या बस रस्त्यावर धूर सोडत धावत आहेत. त्यामुळे केडीएमटीला या प्रदूषणाची कधी जाणीव होणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

कल्याण-डोंबिवली शहर प्रदूषणाच्या बाबतीत नेहमीच गाजत असते. डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्या, शहरातील वाहनांची वाढती संख्या, रस्त्यांची सुरू असलेली कामे, शहरातील बांधकामे आदींमुळे शहरातील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी, प्रदूषणाच्या बाबतीत कल्याण-डोंबिवली अग्रेसर असते. शहरातील प्रदूषण कमी व्हावे, यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना राबवण्यात येतात. शहरातील बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदारांना सूचना करणे, रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी महागड्या गाड्या आणणे आदी उपाययोजना केल्या जातात; पण पालिकेचा परिवहन विभाग मात्र या प्रदूषणाला हातभार लावत असल्याची बाब कुणाच्याच निदर्शनास कशी येत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या बस आगारात धूळखात पडून आहेत. प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या बस रस्त्यावर धावत आहेत.

केडीएमटीच्या उपक्रमात १४१ बस आहेत. त्यापैकी ५० ते ६० बस या रस्त्यावर धावत आहेत तर ८० बस या दुरुस्तीच्या निधीअभावी गणेशघाट आगारात धूळखात पडल्या आहेत. रस्त्यावर धावणाऱ्या अनेक बसचे आयुर्मान हे संपुष्टात आले आहे; मात्र त्या रस्त्यावर चालविल्या जात आहेत. त्यातून काळा धूर निघत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत आहे. या धुराचा रस्त्यावरील वाहनधारक, पादचाऱ्यांना त्रास होतो.

शहरातील वाढते वायुप्रदूषण रोखण्यासाठी परिवहन विभागाने प्रदूषणमुक्तीचा संकल्प करत इलेक्ट्रिक बस केडीएमटीच्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला. २०७ इलेक्ट्रिक बस केडीएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यापैकी १० बस मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कल्याण-डोंबिवलीत आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसचे १२ फेब्रुवारीला लोकार्पणदेखील झाले; मात्र अद्याप त्या बस बाळासाहेब ठाकरे आगारात धूळखात पडल्या आहेत.

घाईघाईत लोकार्पण
इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचा अभाव, कागदपत्रांची पूर्तता पूर्ण न झाल्याने या बस आगारात उभ्या आहेत. लवकरच या बस रस्त्यावर धावतील, असे आश्वासन गेले कित्येक महिने केडीएमटीचे व्यवस्थापक दीपक सावंत देत आहेत; मात्र अद्याप या बस रस्त्यावर उतरल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाईघाईत लोकार्पण करण्यात आले. जर सुविधाच नव्हत्या, तर लोकार्पणाचा घाट कशाला घातला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

घनकचरा विभागाच्या गाड्यांतून प्रदूषण
पीयूसी नसल्याने तसेच धूर सोडणाऱ्या वाहनांना रस्त्याच्या बाजूला त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणारे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना सरकारी वाहनांच्या प्रदूषणाचे गांभीर्य का नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. वायुप्रदूषणाचा मुद्दा गंभीर असल्याने वायुप्रदूषण करणाऱ्या वाहनांवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून तत्काळ दंडात्मक कारवाई होते; पण केडीएमटी बसला त्यातून मुभा देण्यात आली आहे. केडीएमटीसह केडीएमसीच्या घनकचरा विभागाच्या गाड्यादेखील काळा धूर सोडत असतात, त्यावर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT