मुंबई

डोंबिवली एमआयडीसी परिसरात पाणीटंचाई

CD

डोंबिवली एमआयडीसी परिसरात पाणीटंचाई
रहिवाशांचे एमआयडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : एमआयडीसीतील जिमखाना रोड व सागर्ली परिसरात मागील अनेक दिवसांपासून पाण्याची टंचाई भेडसावत आहे. एमआयडीसी प्रशासनाकडे याबद्दल वारंवार तक्रार करूनदेखील अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. ४) येथील रहिवाशांनी एमआयडीसी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला.

डोंबिवली एमआयडीसी परिसरात मागील काही दिवसांपासून पाण्याची तीव्र समस्या भेडसावत आहे. आठ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांनी एमआयडीसी डोंबिवली विभागाचे अधिकारी शंकर आव्हाड यांच्याकडे भेट मागितली होती. गुरुवारी सकाळी रहिवासी एमआयडीसी कार्यालयात पोहोचले. यावेळी एमआयडीसी अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला.

मागील आठवड्यापासून घरात पाणी येत नाही. बाहेरून एक टँकर विकत घेण्यासाठी दररोज सुमारे दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागतात. दुकानातून पाण्याचा बाटला विकत आणण्यासाठी किती पैसे खर्च करायचे, असे प्रश्न रहिवाशांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केले. पाण्याचे देयक भरणा करण्याचे चुकले तर तत्काळ नळजोडणी कापण्याची कारवाई एमआयडीसीकडून केली जाते. मग आठवड्यापासून पाणी नसूनही एमआयडीसी अधिकारी शांत का बसले आहेत, असे प्रश्न रहिवाशांंनी केले.

कार्यालयाला दांडी मारून आंदोलनात सहभागी
बहुतांंशी महिला, पुरुष कर्मचारी कार्यालयाला दांडी मारून या आंदोलनात सहभागी झाले होते. एमआयडीसी अधिकारी ज्या वेळेत पाणी येईल सांंगतात, ती वेळ कोणालाच सोयीस्कर नाही. एमआयडीसीच्या इतर भागात मुबलक पाणीपुरवठा होत आहे. मग डोंबिवली जीमखान्यावरील रहिवाशांचे पाणी कोण चोरत आहे, त्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली. एमआयडीसीतील ६० हून अधिक रहिवासी या आंदोलनात सहभागी झाले होते. खासदार, आमदारांना आमच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे आम्हाला ही आक्रमक भूमिका घ्यावी लागली, अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT