मुंबई

श्री मलंगगड अतिक्रमणमुक्त करण्यास सुरुवात

CD

श्री मलंगगड अतिक्रमणमुक्त करण्यास सुरुवात
ठाणे जिल्हा प्रशासनाची पहाटे चारपासून कारवाई

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ ः ऐतिहासिक किल्ले विशालगडाच्या अतिक्रमणमुक्तीनंतर आता ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगड अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाकडून गुरुवारी (ता. ४) पहाटे चार वाजल्यापासून कारवाईस सुरुवात झाली. गडावरील अतिक्रमित घरे, ढाबे, हॉटेल्स जमीनदोस्त करण्यात येत आहेत. या मोहिमेत ६०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गडावरील वीजपुरवठादेखील खंडित करण्यात आला.
अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकामे उभी राहत होती. गडावर दरडी कोसळण्याच्या वाढत्या घटना घडत असतानाही अनेक जण जीव धोक्यात घालून येथे राहत आहे. वाढत्या वस्तीमुळे येथे हॉटेल्स, ढाबेदेखील उभे राहिले होते. यंदा पहिल्याच पावसात दरड घरावर कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उसाटने येथील कीर्तन महोत्सवात ''श्री मलंगगडाच्या बाबतीत जे तुमच्या मनात आहेत, तेच माझ्या मनात आहे'', असे विधान केले होते. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही श्री मलंगगड मुक्तीसंदर्भात विधान केले होते. सध्या राज्यात अनधिकृत बार, पब, ढाब्यांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसारच श्री मलंगगडावरील बेकायदा वस्तीसह हॉटेल, ढाब्यांवरही कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या मोहिमेत वन विभाग, महसूल विभाग, उल्हासनगर-अंबरनाथ नगरपालिकेचे कर्मचारी सहभागी झाले. पोलिस बंदोबस्तात गुरुवारी पहाटे चारपासून ही कारवाई हाती घेण्यात आली.
----
६० हून अधिक आस्थापनांवर कारवाई
श्री मलंगगडावरील कारवाईत पहिल्या टप्प्यात गुरुवारी एकूण ६० घरे, दुकाने आणि ढाब्यांवर कारवाई करण्यात आली. पुढील कारवाई पुढच्या टप्प्यात करण्यात येणार आहे. यापूर्वी कोल्हापुरातील विशालगड अतिक्रमणमुक्त करण्यात आला होता. त्यानंतर आता श्री मलंगगड अतिक्रमणमुक्त होतो का, हे पाहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT