मुंबई

टीम इंडियाची विजयी मिरवणूक महागात

CD

मिरवणुकीसाठी आलेल्या
तिघांना कारने उडवले

दोन महिलांसह चार वर्षांचे बालक जखमी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : क्रिकेटच्या टी-२० विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघाची मरीन ड्राईव्‍हवर गुरुवारी विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना तारापोरवाला मत्स्यालयाजवळ एका भरधाव कारने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. यात चार वर्षांच्या बालकासह त्याची आई आणि आत्या जखमी झाले आहेत. कारचालकाने अन्य वाहनचालकाच्या मदतीने त्यांना भाटिया रुग्णालयात दाखल केले. जखमी महिलेच्या जबाबावरून मरीन ड्राईव्‍ह पोलिसांनी कारचालकाविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

गावदेवी परिसरात राहणारी पूजा बोयट (२५), तिची वहिनी महिमा (२५) आणि पुतण्या आयांश (४) हे टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी वानखेडे स्टेडियमच्या दिशेने जात होते. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तारापोरवाला मत्स्यालयाजवळ रस्ता ओलांडताना चौपाटीच्या दिशेने जाणाऱ्या उदयशंकर झा यांच्या कारने त्यांना धडक दिली. त्यात पूजा बेशुद्ध पडली होती; रुग्णालयात नेल्यावर ती शुद्धीवर आल्याची माहिती मरीन ड्राईव्‍ह पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT