मुंबई

शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा फटका

CD

शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा फटका

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : घोडबंदर परिसरात ट्रेलर भररस्त्यात बंद पडल्यामुळे शुक्रवारी (ता. ५) सकाळी आनंदनगर ते कापूरबावडीपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीचा फटका कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसह शालेय विद्यार्थ्यांना बसला. परिणामी अनेक शाळेच्या बस या कोंडीत अडकून होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे दुपारच्या सत्रातील शाळांवर त्याचा परिणाम दिसून आला. काही शाळांनी ऑनलाईनच्या माध्यमातून वर्ग घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले.
पूर्व द्रुतगती महामार्गावर घोडबंदर येथील आनंदनगर सिग्नल परिसरात शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ट्रेलर बंद पडल्याची घटना घडली. आधीच या मार्गावर मेट्रोचे काम आणि त्यात वाहन बंद पडल्यामुळे ही मार्गिका अत्यंत अरुंद झाली. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती. त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या. या कोंडीचा फटका शहरातील अंतर्गत मार्गावरही बसला. या भागात अनेक खासगी शाळा, सरकारी शाळा आणि महाविद्यालय आहे. घोडबंदर भागातील श्री माॅं शाळा आणि सेंट झेव्हियर्स शाळेने या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली. यासंदर्भातील संदेश शाळा प्रशासनाने सकाळी पालकांच्या व्हॉटसॲपवर पाठवले, तर डीएव्ही शाळेने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेतले.

‘स्वत:च्या जबाबदारीवर शाळेत घेऊन या’
घोडबंदर परिसरातील काही शाळांनी वाहतूक कोंडीमुळे शाळेची बस येण्यास विलंब होईल किंवा बस येऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या पाल्याला स्वत:च्या जबाबदारीवर शाळेत घेऊन या, असा संदेश पालकांना पाठवला. त्यानुसार काही पालक स्वत: आपल्या मुलाला शाळेत सोडण्यास गेले, तर काही पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवले नसल्याचे चित्र दिसून आले. ज्या शाळेच्या बस विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत जाण्यास निघाल्या होत्या, त्या बस बराच वेळ या कोंडीत अडकून पडल्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास विलंब झाला.


--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT