मुंबई

वरळी हिट अँड रन (सुधारित बातमी)

CD

बेदरकारपणामुळे महिलेचा बळी
वरळीत ‘हिट अँड रन’ : दोघांना अटक, मुख्य आरोपी फरार
मुंबई, ता. ७ : पुण्यातील पोर्शे कारच्या ‘हिट अँड रन’च्या घटनेची मुंबईत पुनरावृत्ती झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर याने बेदरकारपणे कार चालवून दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत कावेरी नाखवा (वय ४५) या महिलेचा मृत्यू झाला, तर पती प्रदीप हे जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे सव्‍वापाचच्या सुमारास ॲनी बेझंट रोडवर हा अपघात झाला. धडक दिल्यानंतर महिलेला १०० ते १५० मीटरपर्यंत फरफटत नेले. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात मुख्य आरोपी मिहीर शहा (वय २४) याच्यासह त्याचे वडील राजेश शहा आणि चालक राजऋषी बिडावत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मिहीर हा फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती परिमंडळचे उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली.
अपघातानंतर सीसीटीव्‍ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या कावेरी नाखवा आणि त्याचे पती प्रदीप नाखवा यांचा मासेमारीचा व्यवसाय आहे. दोघे रविवारी पहाटे क्रॉफर्ड मार्केट येथे मच्छी आणण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. बाजारातून परतत असताना हाजीअलीवरून थोडे पुढे ॲनी बेझंट रोडवर एट्रिया मॉलजवळ मिहीर शहाच्या कारने त्यांना मागून धडक दिली. प्रदीप हे कारच्या बोनेटवर पडून डाव्या बाजूला पडले, तर कावेरी या कारच्या समोर आल्या. मात्र, त्याचवेळी कारचालकाने वाहनाचा वेग वाढवल्याने कावेरी यांना सीफेस येथील सीलिंकपर्यंत म्हणजे दोन किलोमीटरहून अधिक फरफटत नेले. त्यानंतर पुढे ब्रेक मारताच कावेरी रस्त्याच्या शेजारी पडल्या. त्यांना तेथेच जखमी अवस्थेत ठेवून आरोपीने वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून पळ काढला. त्यानंतर वांद्रे येथील कलानगर परिसरात कार व चालकाला तेथेच सोडून धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमी कावेरी यांना नायर रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
...
कोण आहेत शहा?
राजेश शहा यांचा बांधकाम व्यवसायातील कच्चा माल पुरवण्याचा व्यवसाय आहे. शहा हे पूर्वी ठाकरे गटाचे पालघर जिल्हाध्यक्ष होते. पक्षफुटीनंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.
...
बारचा परवाना निलंबित
मिहीर शहा याने जुहूतील बारमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्यपान केले. बार उशिरापर्यंत सुरू ठेवल्याप्रकरणी बारचालकाची चौकशी सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या बारचा परवाना निलंबित केला आहे. या घटनेनंतर जुहू परिसरातील बारची चौकशीही निरीक्षकांकडून सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
---
मित्रांसोबत रात्रभर मद्यपान?
मिहीर याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. मिहीर याने रात्री जुहू येथील एका बारमध्ये मित्रांसोबत मद्यपान केले होते. घरी गेल्यावर त्याने चालकाला लाँग ड्राईव्हला जायचे असल्याचे सांगितले. त्या वेळीही तो नशेत असल्याचा संशय आहे. त्यांचे १८ हजार रुपयांचे बिल झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार मुंबईहून गोरेगावला जाताना मिहीर स्वतः गाडी चालवत होता. त्याच्या तपासणीनंतर त्याने मद्यपान केले होते की नाही, हे स्पष्‍ट होणार आहे.
...
राजकीय हस्तक्षेप झाला तरी पाठीशी घालू नका : आदित्य ठाकरे
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वरळीला धाव घेत मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून ते पोलिस स्थानकात गेले. ठाकरे म्हणाले की, या घटनेचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही बड्या नेत्याने दूरध्वनी केला तरी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. पोलिसांनी दबावाला बळी न पडता काम करावे.
. . . .
कारवाई होणारच : एकनाथ शिंदे
वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. आमच्या पक्षाचा पदाधिकारी असला तरी त्याच्यावर कारवाई होणारच, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिले.
. . .
कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही : फडणवीस
वरळी तसेच अन्य कुठच्याही हिट अँड रन प्रकरणात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. यासंदर्भात पोलिस दलावर दबाव आणण्याचा प्रश्‍नच नाही. कुणी फोनही केलेला नाही, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT