मुंबई

अकलोली गरम पाण्याची कुंड बुडाली

CD

अकलोलीतील गरम पाण्याची कुंडे बुडाली

वज्रेश्वरी, ता. ८ (बातमीदार) : पर्यटनस्थळ म्हणून परिचित असलेल्या अकलोली कुंड येथे तानसा नदीला पूर आला असल्याने येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. तसेच, गरम पाण्याची काही कुंडे पाण्याखाली बुडाली आहेत.
मुसळधार पावसामुळे गणेशपुरी, वज्रेश्वरी, अकलोली, अंबाडी या परिसराला पावसाने पूर्ण झोडपले आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे येथील तिन्ही गावांजवळून जाणाऱ्या तानसा नदीला पूर आला आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. या अतिवृष्टीमुळे भातरोपे मोठ्या प्रमाणात बुडाली आहेत. तर नदीकिनाऱ्यालगत अकलोली येथील गरम पाण्याची कुंडे बुडाली आहेत.
काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या भागात पावसाची संततधार सुरूच असून नागरिकांनी घरीच राहणे पसंद केले आहे. मुसळधार पावसामुळे येथील अंबाडी नाका परिसरात व जवळ झिडके ग्रामपंचायतीच्या अर्धवट असलेल्या गटारकामामुळे रस्ता व पूल पाण्याखाली गेले आहे. तसेच, येथील ज्येष्ठ नागरिक विजय गायकवाड यांच्या घराभोवती पाणी साचले आहे.

जनजीवन विसकळित
अंबाडी-वाडा मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात होत आहेत. दरम्यान, गोराड, निंबवली, अवचित पाडा यांनादेखील या पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे येथील जनजीवन विसकळित झाले आहे. शनिवार-रविवारी मोठ्या प्रमाणात भाविक गरम पाण्यात आंघोळ करण्यासाठी येत असतात. सध्या या कुंडांवरून पाणी जात असल्याने पर्यटकांनी या ठिकाणी येऊ नये, असे आवाहन गणेशपुरी पोलिसांनी केले आहे. यावेळी गणेशपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष बोराटे यांनी अकलोली येथील कुंड आणि नदीकिनाऱ्यावर असलेल्या भागांमध्ये पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT