मुंबई

मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी २० कोटींचा निधी

CD

विरार, ता. ११ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका परिसरात ‘मूलभूत सोयीसुविधांचा विकास’ या योजनेंतर्गत कामांना प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठीचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. परिसरातील विविध कामांना २० कोटींचा निधी प्राप्त होणार आहे.

राज्यातील महापालिकांना मूलभूत सुविधांचा विकास करण्याच्या कामासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत नालासोपारा मतदारसंघातील मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे, अशी विनंती आमदार क्षितिज ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. नगरविकास विभागाने विविध कामांकरिता १० कोटी रुपये निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.

डोंगरपाडा येथे अभ्यासिका इमारत बांधणे, डोंगरपाडा आरोग्य केंद्रालगत बालोद्यान विकसित करणे, आचोळे तलाव येथे आरसीसी रिटेनिंग वॉल बांधणे, बिलालपाडा येथे बहुद्दशीय इमारत बांधणे, मार्केट व बहुद्देशीय इमारत बांधणे, वसंत नगरी येथील मैदानाचा विकास करणे आदी अन्य कामांचाही प्रस्ताव क्षितिज ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही याच योजनेंतर्गत काही कामे प्रस्तावित केलेली आहेत. जूचंद्र स्पोर्टस कॉम्प्लेक्स बांधणे, कामण येथे पिराचा तलाव विकसित करणे, नवघर पूर्व येथील स्वागत उद्यान विकसित करणे, नवघर पूर्व आरोग्य केंद्रासमोरील जागेत मार्केट विकसित करणे आणि नायगाव-वडवली येथील मार्केटचे नूतनीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे. याकरताही सरकारने १० कोटींची मंजुरी दिलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT