मुंबई

कौशल्य, रोजगार विभागाच्या दोन वर्षांच्या पुस्तिकेचे प्रकाशन

CD

कौशल्य, रोजगार विभागाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
दोन वर्षांच्या कार्याचा आढावा
मुंबई, ता. ८ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागामार्फत दोन वर्षांत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रम आणि योजनांच्या पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देशाचा विकास वेगाने होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवापिढीला कौशल्ययुक्त बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या विभागात सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील तरुणांसाठी जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यासाठी लोढा यांचा प्रयत्न असल्याचे दिसते.
दोन वर्षांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभागात नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करून कौशल्ययुक्त आणि बेरोजगारमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. २०२०च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्येदेखील व्यावसायिक शिक्षणाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. आजचा सक्षम युवा उद्याचा उज्ज्वल महाराष्ट्र घडवणार आहे, हे लक्षात घेऊन राज्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी, ग्रामीण भागात ५११ प्रमोद महाजन ग्रामीण व कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यासह पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मेळावे असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असल्याचे लोढा यांनी यावेळी सांगितले.
----
रोजगारांसंबंधी विविध उपक्रम
विभागामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थाना आर्थिक सहाय्य योजना, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, करिअरविषयक साहित्य, डिजिटल अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना, मॉडेल करिअर सेंटर, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांशी सामंजस्य करार, आंतरराष्ट्रीय रोजगार केंद्राच्या माध्यमातून परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगार नोंदणी, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन, राज्यातील इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही लोढा यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT