मुंबई

आचोळेतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाला हिरवा कंदील

CD

विरार, ता. ९ (बातमीदार) : आचोळे येथील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी तब्बल २५० कोटींच्या निधीला महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी या रुग्णालय उभारणीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या १० जुलै रोजीच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला नगरविकास विभागाने या संबंधीचा अध्यादेश काढला आहे. आमदार ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वसई-विरारकरांना दिलेली ही आरोग्यदायी भेट मानली जात आहे.

वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’ अंतर्गत येणाऱ्या नालासोपारा-आचोळे आरक्षण क्रमांक ४५५ व सर्व्हे क्रमांक ६ या ठिकाणी दोनशे खाटांचे सुसज्ज रुग्णालय प्रस्तावित आहे. आमदार क्षितिज ठाकूर यांनी या रुग्णालय उभारणीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यानंतर या रुग्णालयाबाबतचा प्रस्ताव सरकारला प्राप्त झालेला होता. प्रस्तावित रुग्णालयाच्या कामासाठी वसई-विरार महापालिकेने १५ कोटी ८२ लाख रुपये निधीची तरतूदही करून कार्यादेशही काढलेले होते, तसेच या रुग्णालयाच्या वाढीव जागेकरताही वसई-विरार महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता, मात्र आता सदर प्रकल्पाचा १०० टक्के हिस्सा सरकारचा राहणार आहे.

‘महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या योजनेंतर्गत नगरविकास विभागाने २५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रथम टप्प्यात २५ कोटी रुपयांचा निधी नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडील निधीतून पालघर जिल्हाधिकारी यांना शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यास मंजुरीही दिली आहे.

आरोग्य सुविधा हा वसई-विरारकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तो त्यांचा हक्क आहे. त्यासाठी आमदार क्षितिज ठाकूर, आमदार हितेंद्र ठाकूर यांची आग्रही मागणी राहिलेली आहे. शहरात सामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसल्याने मुंबई, ठाणे येथे जावे लागत आहे. प्रस्तावित रुग्णालयांच्या माध्यमातून वसई-विरारकरांना या सुविधा मिळणार आहेत.
- क्षितिज ठाकूर, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT