मुंबई

५४ वर्षाच्या महिलेवर कामा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

CD

महिलेच्या पोटातून काढली चार किलोची गाठ
५४ वर्षांच्या महिलेवर कामा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : एका ५४ वर्षीय महिलेच्या पोटातून चार किलोची कर्करोगाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. राज्य सरकारच्या कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी या महिलेवर शस्त्रक्रिया करून ही गाठ काढली. गाठीचे नमुने प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवले आहेत.
कामा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये १ जुलै रोजी ही महिला काही तक्रारींसह दाखल झाली होती. एक आठवड्यापासून पोटदुखी आणि दोन आठवड्यांपासून जुलाब अशी तक्रार घेऊन कुलाबा येथील ५४ वयाच्या रहिवासी ग्रेटा पीटर डेसा यांना त्याच दिवशी रुग्णालयाच्या सर्जिकल कक्षामध्ये दाखल करून घेण्यात आले. त्यांना एक मूल असून एक गर्भपात आणि एका बाळाचे जन्मानंतर निधन झाल्याचे समजले. त्यासोबतच, त्यांनी रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव होत असल्याचीदेखील माहिती डॉक्टरांना दिली. या माहितीच्या आधारे त्यांची ५ जुलै रोजी सोनोग्राफी करून घेण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या पोटात ओवेरियन मास असल्याचे निदर्शनास आले‌. याची खात्री करून घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी जे. जे. रुग्णालयामध्ये एमआरआय चाचणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या पोटात अंडाशयाच्या डाव्या बाजूला १४ बाय २२ बाय २२ सेंमी इतक्या आकाराची गाठ असल्याचे निदर्शनास आले. गर्भाशयदेखील मोठे झाल्याचे दिसून आले.
या गाठीचे निदान करण्यासाठी काही रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्यांचे प्रमाण सामान्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आणि इतर केलेल्या तपासण्या मात्र सामान्य असल्याचे दिसून आले. या तक्रारींसोबतच त्यांना नव्याने उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होत असल्याचे निदान झाले होते. वरील सर्व तपासण्यांच्या आधारे त्यांचे मंगळवारी एक्सप्लोरटरी लेपरॉटॉमी विथ लेफ्ट ओवरीयन सिस्टिक्टोमी विथ टोटल अब्डोमिनल हिस्टरेक्टॉमी करण्यात आली. जी. टी. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये महिलेला निरीक्षणासाठी ठेवण्यात आले आहे.

डॉक्टरांच्या देखरेखीखाली महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. पोटातून काढलेल्या गाठीचे वजन जवळपास ४.७१ किलो एवढे असून ही गाठ कर्करोगाची असण्याची शक्यता आहे.
-डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT