मुंबई

प्रवाशांसाठी डोंबिवली रेल्वे पोलिसांची जनजागृती

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. लोकलमधील गर्दीमुळे रेल्वे रुळावर पडून, तसेच रेल्वे रूळ ओलांडताना अनेक प्रवाशांना दिवा ते डोंबिवली स्थानकादरम्यान आपला जीव गमवावा लागला आहे. रेल्वे रूळ ओलांडणे हे धोकादायक आहे, हे माहीत असूनही अनेकजण जीवाची पर्वा न करता रेल्वे रूळ ओलांडतात. अशा प्रवाशांमध्ये जनजागृतीसाठी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी भिंती चित्रे रेखाटली आहेत. यमराजला स्वतःहून निमंत्रण देऊ नका, असा संदेश देणारे चित्र सध्या रेखाटून रेल्वे पोलिस जनजागृती करत आहेत.

डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात. रेल्वेला सर्वाधिक उत्पन्नदेखील या स्थानकातूनच मिळते. डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेने रेल्वेच्या फेऱ्या मात्र कमी पडत आहेत. त्यातच डोंबिवलीतून सुटणाऱ्या रेल्वेची संख्या कमी असल्याने लोकलमध्ये चढताना प्रवाशांची दमछाक होते.

यमराज देतात संदेश
प्रवाशांनी आपला जीव धोक्यात टाकू नये. त्यासोबतच अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. रेल्वे रूळ ओलांडू नका, अशी विनंती पोलिसांनी केली आहे. भिंतीवर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना यमराज रेड्यावर बसण्यासाठी बोलावत असल्याचा संदेश या चित्रातून देण्यात आला आहे. लोकलमधील गर्दीमुळे अनेक डोंबिवलीकर प्रवाशांनी आपले जीव गमावल्याच्या घटना आतापर्यंत घडल्या आहेत. लोकल पकडण्याच्या गडबडीत अनेक प्रवासी रूळ ओलांडताना आजूबाजूने येणाऱ्या लोकलचा अंदाज घेत नाहीत. चाकरमानी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा पद्धतीने रूळ ओलांडताना दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT