मुंबई

कशेडी घाटात जीवाला धोका

CD

पोलादपूर, ता. ११ (बातमीदार)ः पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावच्या हद्दीतील कशेडी घाटाचा रस्ता खचू लागला आहे. दरवर्षी पावसाळ्यात या परिसरातील रस्ता खचत असल्याने महामार्ग विभागाने यंदाही भराव टाकला होता; पण तरीदेखील रस्ता खचत असल्याने अपघाताची शक्यता आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरपासून ९ किलोमीटर अंतरावरील कशेडी घाटातील डांबरी रस्ता यंदाही खचला आहे. रत्नागिरीच्या दक्षिण बाजूने आणि मुंबईच्या उत्तर बाजूमध्ये दोन फुटांपर्यंत रस्ता खचलेला आहे. या मार्गावरून ट्रेलर, टेम्पो, ट्रक अशा ४० टनांपेक्षा जास्त क्षमतेच्या माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाची वर्दळ असते. त्यामुळे पावसाळ्यात अतिशय धोकादायक ठिकाण बनले आहे. महत्त्वाचे म्हणजे २५ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीत या ठिकाणी डोंगराच्या माथ्याचा काही भाग खाली घसरला होता. यामुळे २५ फुटांपर्यंतचा डोंगर हटवण्यासाठी पंधरा दिवस लागले होते. तेव्हापासून दर पावसाळ्यात हा रस्ता खचत आहे; पण कायमस्वरूपी दुरुस्तीत महामार्ग बांधकाम विभाग अपयशी ठरला आहे.
--------------------------------------------------
गाव-वाड्यांची वाहतूक बंद
कशेडी घाटात अपघात झाल्यास तळकोकणात आणि मुंबई दिशेने जाणाऱ्या बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. जंगलाचा भाग असल्याने रात्री वाहनचालक आणि प्रवाशांच्या यातनांना पारावार राहत नाही. तसेच वाहतूक बंद होत असल्याने परिसरातील पळचिल, महालगुर, रावतळी, कशेडी, मनवेधार, गवळीवाडी, खवटी, जलाचीवाडी, किंजळा, मोरेवाडी, ओंबळी, आडाचीवाडी अशा गाव-वाड्यांमधील विद्यार्थ्यांसह प्रवासीवर्गाचीही प्रचंड गैरसोय होते.
-----------------------------------
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भोगाव हद्दीतील रस्ता हा दरवर्षी खचतो. त्यावर तात्पुरत्या मलमपट्टीएेवजी भौगोलिकदृष्ट्या अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- प्रसाद इंगवले, वाहनचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT