मुंबई

द्रोणागिरी, तळोज्यात घर घेण्याची संधी

CD

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर): जानेवारी २०२४ च्या गृहनिर्माण योजनेंतर्गत द्रोणागिरी व तळोजा येथील ३,३२२ सदनिकांच्या सोडतीसाठी सिडकोला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या १९ जुलै रोजी या घरांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.
महागृहनिर्माण योजनेतील या घरांची संगणकीय सोडत १९ एप्रिल २०२४ रोजी काढली जाणार असल्याचे सिडकोने यापूर्वी जाहीर केले होते, मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सोडत काढणे सिडकोला शक्य झाले नाही. दरम्यान, निवडणुकांचा निकाल लागून महिना लोटला तरी घरांची संगणकीय सोडतीची घोषणा झाली नसल्यामुळे नाराजीचा सूर उमटत होता. अखेर १९ जुलै रोजी जानेवारी २०२४ च्या योजनेची संगणकीय सोडत काढणार असल्याची माहिती सिडकोच्या गृहनिर्माण विभागाचे पणन व्यवस्थापक श्रीनिवास मोकलीकर यांनी दिली आहे. या योजनेंतर्गत द्रोणागिरी व तळोजा परिसरातील ३२२ सदनिकांपैकी द्रोणागिरी नोड येथील ६१ व तळोजा नोड येथील २५१ सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तर द्रोणागिरी येथील ३७४ व तळोजा येथील २,६३६ मिळून ३,०१० सदनिका सर्वसाधारण घटकांसाठी आहेत.
--------------------------------
व्याज भरण्याचा भूर्दंड
सिडकोच्या या योजनेत अल्प उत्पन्न गटातील नागरिकांनी दीड लाख रुपये, तर अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांनी ७५ हजार रुपये अनामत रक्कम म्हणून भरले आहेत. सिडकोच्या या योजनेत घर घेण्यास साडेचार हजारांहून अधिक नागरिक इच्छुक आहेत. त्यामुळे अनामत रकमेवर बँकेला सहा महिन्यांचे व्याज, पैसा वापरावयास मिळणार आहे, तर दुसरीकडे कर्ज काढून अनामत रक्कम भरणाऱ्यांना विनाकारण व्याज भरावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT