मुंबई

कोट्यवधींचा गंडा घालणारी अटकेत

CD

पनवेल, ता. ११ (वार्ताहर) : बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीतून ५० टक्के नफा देण्याच्या प्रलोभनातून खांदा कॉलनी, तसेच नवीन पनवेल भागातील महिलांची पावणे तीन कोटींची फसवणूक करणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने अटक केली आहे. न्यायालयाने गुरुवारी या महिलेची दहा दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली असून या प्रकरणात आणखी तिघेजण फरार आहेत.
खांदेश्वर पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीसह संगनमताने खोटे दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी मेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेत हा गुन्हा नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी वैशाली कोळीने उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, १८ जून रोजी तिचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर तेव्हापासून आरोपी महिला पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी मोबाईलच्या लोकेशनवरून वैशाली कोळीला नवीन पनवेल परिसरातून अटक केली. गुरुवारी सकाळी तिला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले असता २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात महिलेचा पती संतोष कोळी, मुलगा चैतन्य कोळी आणि बिल्डर बाबा शुक्ला फरारी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT