मुंबई

कासारवडवलीत रिक्षाचालकावर चाकूने हल्ला

CD

ठाणे, ता. १४ (वार्ताहर) : कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षाचे चाक खड्ड्यात गेल्याने दुचाकीस्वारावर पाणी उडाले. याचा राग मनात धरून रिक्षाचालक शाकीर रसुल शेख (३३) याला दुचाकीस्वाराने मारहाण केली. त्यानंतर रिक्षाचालक प्रवाशांना सोडून आल्यावर पुन्हा त्याच्यावर चाकूने वार केल्याची घटना शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात आरोपी शाहबाज उर्फ नानू खान याच्या विरोधात शनिवारी (ता. १३) रोजी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार शाकीर रसुल शेख (३३) आनंदनगर, घोडबंदर रोड येथे राहत असून शुक्रवारी ठाणे स्थानकावरून कासारवडवली येथे प्रवासी भाडे घेऊन निघाला होता. यावेळी सायंकाळी साडेपाच वाजता रिक्षा खड्ड्यात गेल्याने दुचाकीवरील शाहबाज उर्फ नानू खान याच्या अंगावर खड्ड्यातील पाणी उडाले. तेव्हा दुचाकी रिक्षासमोर उभी करून शाहबाजने शाकीर शेखला मारहाण केली. त्यानंतर रिक्षाचालक भाडे सोडून पुन्हा घोडबंदर रोडवर आला. त्यावेळी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्याच ठिकाणी आरोपी शाहबाज याने अडवून जवळच्या चाकूने शाकीर शेख याच्या पाटीवर वार केला आणि दुचाकीवरून निघून गेला. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात शाहबाज उर्फ नानू खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: "ओके टेलर मी तुला बाळ देतो अन् तुझ्या मांजराला.." इलॉन मस्कने केली आक्षेपार्ह टिप्पणी, राजकीय वाद चव्हाट्यावर

Redmi Note 14 Launch : लवकरच भारतात येणार Redmi Note 14 सिरीज; सुपरफास्ट चार्जिंग अन् एकदम खास फीचर्स

Vinesh Phogat: 'माझ्या परवानगीशिवाय फोटो काढला अन्...', विनेशचा IOA अध्यक्षा पीटी उषा यांच्यावर आरोप

Islampur Vidhan sabha : विरोधातला उमेदवार सुद्धा जयंत पाटीलच ठरवतात? कसा होतो करेक्ट कार्यक्रम, जाणून घ्या इस्लामपुरचे गणित

Latest Marathi News live Updates : गणपती विसर्जनासाठी जुहू चौपाटीवर मोठा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT