Navi Mumbai police  sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल इतक्या कोटींचे अमली पदार्थ केले जप्त!

Crime : दोघेही स्कुटीवरून जात असताना वाशी गाव येथे त्यांची पोलिसांकडून झडती घेण्यात आली.

CD

नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर): नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने सायन-पनवेल मार्गावर वाशी गाव येथे दोन कोटी ८० लाखांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. सोमवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत मुंबईच्या माहिममधील दोघांना अटक करण्यात आली आहे.


अमली पदार्थ विरोधी कक्षाला मुंबईत राहणारे दोघेजण अमली पदार्थ घेऊन पनवेलच्या दिशेने येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सायन-पनवेल मार्गावर सोमवारी मध्यरात्री सापळा लावला होता. पहाटे पावणे तीनच्या सुमारास फजल खान व सलाउद्दीन शेख हे दोघेही स्कुटीवरून जात असताना वाशी गाव येथे त्यांची पोलिसांकडून झडती घेण्यात आली.

यावेळी फजल खान याच्याजवळ ७०० ग्रॅम वजनाचे तब्बल एक कोटी ४० लाखांचे, तर सलाउद्दीन शेखजवळ ३०४ ग्रॅम वजनाचे ६० लाख ८० हजारांचे मेफेड्रोन होते. या अमली पदार्थांचे बाजारमूल्य दोन कोटी ८० लाखांच्या घरात आहे. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कलमानुसार गुन्हा दाखल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात; कोणाला कोठून संधी?

Ramesh Wanjale: मनसेनं ठेवली आठवण! रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश वांजळेंना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर

Pune Crime : मालकाने पाळीव कुत्र्याला लटकावले फासावर; पर्वतीमध्येही श्वानावर गोळी झाडल्याचा प्रकार उघडकीस

MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

महिला आयोगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द; ऐन दिवाळीत क्रूर निर्णय घेतल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT