सध्याची आत्याधुनिक लिफ्ट esakal
मुंबई

Thane News: लिफ्टमध्ये अडकलेल्या नऊ महिलांची सुखरूप सुटका

CD

ठाणे, ता. १६ : बाळकुम परिसरातील जास्मिन टॉवरच्या पहिल्या मजल्यावरती लिफ्टमध्ये तब्बल नऊ महिला अडकल्याची घटना मंगळवारी (ता.१६) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या अडकेलल्या महिलांना अवघ्या १० ते १५ मिनिटांत सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून या सर्व महिला वसंत विहार शाळेच्या कर्मचारी आहेत.

जास्मिन टॉवर ही तळ अधिक १८ मजली व अंडरग्राउंडपार्किंग अशी इमारत आहे. या इमारतीच्या ११ व्या मजल्यावर जात असताना या नऊ महिला एकत्र जात असताना पहिल्या मजल्यावर लिफ्टमध्ये त्या अडकल्या. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेत त्यांची सुखरूप सुटका केली.

पुष्पा हासे (वय ५७), रुपाली मराठे (वय ५०), लीना नंबियार (वय ५४), दीपिका रुपवने (वय ४१), पूनम सिंग (वय ३७), सुमन गायकवाड (वय ३४), सीमा ढाकणे (वय ४४), श्रीकला नायर (वय ५३) आणि उमा सोनी (वय ४०) अशा लिफ्टमध्ये अडकलेल्या महिलांची नावे असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT