shyam manav politics esakal
मुंबई

Shyam Manav in politics: अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ उभारणारे श्याम मानव राजकीय आखाड्यात ? निवडणूक लढवण्यावर दिलं उत्तर

Shyam Manav Profile: श्याम मानव यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर ते राजकारणात येणार आहेत, अशा चर्चा सुरू झाल्या; मात्र जेव्हा-जेव्हा देशाची लोकशाही धोक्यात आली आहे तेव्हा-तेव्हा मी राजकीय भूमिका घ्यायला कधी कचरलो नाही, असे श्याम मानव यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

विनोद राऊत

मुंबई, ता. २५ ः उद्धव ठाकरे यांना तुरुंगात पाठवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता, त्यासाठी त्यांनी अनिल देशमुखांवर दबाव टाकला होता, असा दावा श्याम मानव यांनी केला. मानव यांच्या गौप्यस्फोटामुळे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण नव्याने तापले आहे. राज्यात अंधश्रद्ध निर्मुलन चळवळ उभारणारे मानव यांनी अचानक राजकारणात एण्ट्री केली, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. मात्र सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या मानव यांना राजकीय चळवळी नव्या नाहीत. लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा सक्रिय प्रचार केला होता. (shyam manav entry in politics)

श्याम मानव यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर ते राजकारणात येणार आहेत, अशा चर्चा सुरू झाल्या; मात्र जेव्हा-जेव्हा देशाची लोकशाही धोक्यात आली आहे तेव्हा-तेव्हा मी राजकीय भूमिका घ्यायला कधी कचरलो नाही, असे श्याम मानव यांनी ‘सकाळ’ला सांगितले. आणीबाणीच्या काळात मानव यांनी १० महिन्यांचा तुरुंगवास भोगला. जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनी या चळवळीत ते सक्रिय होते. त्यांनी जनता पक्षाच्या उमेदवारांचा राज्यभर प्रचार केला होता.

जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यावर मानव यांनी राजकारणापासून दूर केले. ते अंधश्रद्धा निर्मुलनाच्या चळवळीच्या कामाला लागले. अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरुद्ध कायदा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले. हा कायदा आणण्यात, लागू करण्यात मानव यांचे मुख्य योगदान आहे. मानव म्हणाले, केंद्र सरकारच्या एकंदरीत धोरणामुळे अलीकडे देशाची लोकशाही धोक्यात आले, असे मला ठामपणे वाटले. एकंदरीत गेल्या दीड वर्षात पुरोगामी चळवळीच प्रंचड अस्वस्थता पसरली आहे. लोकशाही वाचवायची असेल तर राजकीय भूमिका घेणे महत्त्वाची आहे, असे जाणवले.


राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही ते सहभागी झाले. इतर सामाजिक संघटनांप्रमाणे श्याम मानव यांच्या संघटनेने लोकसभेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. मानव यांनी विदर्भात आघाडीच्या उमेदवारांसाठी ३६ सभा घेतल्या. या सर्व सभांमध्ये त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर दबाव कसा होता, त्याचा उल्लेख केला होता; मात्र त्याची कुणी दखल घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हे सर्व निर्णय संघटनेतील सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून घेतले.

राजकीय पार्श्वभूमी

श्याम मानव यांच्या कुटुंबाला राजकारणाची मोठी पार्श्वभूमी आहे. मानव यांचे वडील ज्ञानेश्वर कदम हे अनेक वर्षे विनोबा भावे यांचे स्वीय सहायक होते. त्यावेळी पवनार आश्रमात तत्कालीन पंतप्रधानांपासून ते काँग्रेसचे बडे-बडे नेते तिकडे येत. पवनार आश्रमातून प्रकाशित होणाऱ्या साम्ययोग साप्ताहिकाचे ते संपादक होते. यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष (त्या वेळचे जनपद) म्हणूनही त्यांनी काम केले.

त्यामुळे मानव यांना राजकीय वारसा आहे. आणीबाणीनंतर निवडणूक लढवण्याची संधी होती, तेव्हाच मी निवडणूक लढवली नाही, तर आता काय लढवणार, असा सवाल करत, मी निवडणूक लढणार नाही, असे मानव यांनी स्पष्ट केले.

सुपारीचा आरोप नवा नाही!

राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात सुपारीबाज घुसले आहेत. मानव यांच्यासारखे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या नादाला का लागले, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यावर बोलताना, मानव यांनी सांगितले. धीरेंद्र महाराज यांची जेव्हा पोलखोल केली, तेव्हा राहुल गांधी यांची सुपारी घेतल्याचा आरोप माझ्यावर झाला होता. एका भेटीदरम्यान अनिल देशमुखांनी त्यांच्यासोबत काय झाले, कुणी दबाव टाकला हे सांगितले होते, असे मानव सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT