डोंबिवली, ता. १ ः आईचे निधन झाल्यावर तिच्या मृतदेहासोबत १४ वर्षांचा मुलगा चार दिवस घरात एकटाच राहत होता, अशी धक्कादायक बाब कल्याण खडकपाडा परिसरात उघडकीस आली. मृतदेह कुजल्यानंतर दुर्गंधी येऊ लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी तपास केला असता, ही बाब उघडकीस आली. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली. सदर मुलगा मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कल्याण खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका निवासी संकुलातील एका ४४ वर्षीय महिलेचा फ्लॅटमध्ये मृत्यू झाला. त्याबाबत कोणालाच याची माहिती मिळाली नाही. इमारतीत दुर्गंधी येत असल्याने बुधवारी सोसायटीचा सुरक्षा रक्षक व शेजारी विचारणा करण्यासाठी फ्लॅटवर गेले. घराचा दरवाजा ठोठावला असता मुलाने दरवाजा उघडला. तेथील स्थिती आणि महिलेचा मृतदेह पाहून लोकांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ खडकपाडा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास केला असता त्यांना फ्लॅटमध्ये मुलाच्या आईचा मृतदेह आढळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.