cm ladki bahin yojna esakal
मुंबई

Ladki Bahin Yojna: "तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही, तर भाऊ म्हणेन..."मुख्यमंत्री ‘भावा’शी लाडक्या बहिणींचा संवाद

CM Eknath Shinde Ladki Bahin Yojna: आजपर्यंत सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यांत प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधला.

CD

मुंबई, ता. १५ : ‘मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही, तर भाऊ म्हणेन. रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली,’ अशा शब्दांत राज्यभरातील भगिनींनी आपल्या भावना भावाकडे व्यक्त केल्या. कालपासून (ता. १४) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) भगिनींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आजपर्यंत सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यांत प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून आज या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधला.

त्या वेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना, ‘मुख्यमंत्र्यांची बहीण’ अशी नवीन ओळख निर्माण झाल्याचे सांगत मनमोकळेपणाने आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधला.
राज्यभरातील भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना केवळ निवडणुकीपुरता नाही, ती कायम आहे. योजनेकरिता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतूद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील बहिणींना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT