Amol Palekar and Vidya Sinha in a scene from ‘Rajnigandha’ (1974) esakal
मुंबई

Rajnigandha: बासू चॅटर्जींच्या ‘रजनीगंधा’चे पाच दशके अधिराज्य

Rajnigandha’ Turns 50: A Milestone in Indian Cinema: ‘रजनीगंधा’च्या नायकासाठी बासू चॅटर्जी यांची पहिली पसंती अमिताभ बच्चन होती; पण प्रत्यक्षात अमोल पालेकर यांची निवड झाली. नायिकेच्या भूमिकेसाठी शर्मिला टागोर, अपर्णा सेन, मल्लिका साराभाई यांचा विचार झाला

विनोद राऊत


मुंबई: सत्तरच्या दशकात प्रसिद्ध लेखक मनू भंडारी यांच्या कथेवर आधारित आणि बासू चॅटर्जी दिग्दर्शित ‘रजनीगंधा’ सिनेमाने त्यावेळेच्या प्रचलित समाजव्यवस्थेला धक्का दिला. त्या काळी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा बोलबाला होता; मात्र ‘रजनीगंधा’च्या माध्यमातून अमोल पालेकर नावाचा ‘कॉमन मॅन’चा नायक हिंदी चित्रपटससृष्टीला मिळाला. बासूंच्या ‘रजनीगंधा’ला उद्या (ता. २०) ५० वर्षे पूर्ण होत असून पाच दशकानंतरही तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

२० सप्टेंबर १९७४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘रजनीगंधा’ सिनेमा खऱ्या अर्थाने हिंदी चित्रपटसृष्टीतील गेम चेंजर ठरला. साडेसात लाखांच्या बजेटमध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत तयार झालेल्या या सिनेमाने पारंपरिक नायक-नायिकेची व्याख्या बदलवून टाकली. ‘रजनीगंधा’ची नायिका, दीपा ही स्वतंत्र विचाराची, पीएचडी करणारी मुलगी आहे. पहिल्या प्रियकरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती दुसऱ्याच्या प्रेमात पडते. काही वर्षांनंतर नोकरीच्या निमित्ताने पहिल्या प्रियकरासोबत तिची भेट होते. त्या वेळी जोडीदार म्हणून नक्की कुणाची निवड करावी, याची घालमेल तिच्या मनात सुरू होते.

‘रजनीगंधा’च्या नायकासाठी बासू चॅटर्जी यांची पहिली पसंती अमिताभ बच्चन होती; पण प्रत्यक्षात अमोल पालेकर यांची निवड झाली. नायिकेच्या भूमिकेसाठी शर्मिला टागोर, अपर्णा सेन, मल्लिका साराभाई यांचा विचार झाला; मात्र काही कारणामुळे नवा, फ्रेश चेहरा असलेल्या विद्या सिन्हा यांची निवड झाली. ५० वर्षांनंतर मागे वळून बघताना ‘रजनीगंधा’च्या यशात माझे फारसे कर्तृत्व नव्हते, असे चित्रपटात नायक असलेले ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. बासूंच्या दिग्दर्शनाची, प्रत्येक व्यक्तिरेखेची, संगीताची ती कमाल होती. आजच्या पिढीने तो काळ किती वैविध्यपूर्ण होता, हे समजण्यासाठी तरी हा चित्रपट बघितला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

अनेक अडथळ्यांनंतर प्रदर्शित

चित्रपटाच्या नावावरून ‘रजनीगंधा’ कलात्मक सिनेमा वाटत होता. सिनेमातील स्टारकास्ट फ्रेश होती आणि चित्रपटात केवळ दोन गाणी होती. त्यामुळे सिल्व्हर ज्युबिली ठरलेल्या ‘रजनीगंधा’चे वितरण करण्यास सुरुवातीला एकही वितरक तयार नव्हता; पण अनेक अडथळ्यांनंतर प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील सलील चौधरी यांच्या संगीताने धमाल केली. ‘रजनीगंधा फूल तुम्हारे हे’ या लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्याने ‘बिनाका गीतमाले’त कित्येक आठवडे पहिले पायदान सोडले नाही. ‘कई बार यू ही देखा है’ या गाण्यासाठी मुकेश यांना एकुलता एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

तो काळ कसा मंतरलेला होता, विषय, गाणी, कथानकापासून चित्रपट बनवण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आजच्या पिढीला त्या वेळचे संगीत किती वैविध्यपूर्ण होते, याचा अंदाज येईल. गाणे लागल्यावर संगीतकार चटकन ओळखता येत होते. त्यावेळेच्या गायकांच्या आवाजात वैविध्य होते. तो अतिशय श्रीमंत काळ होता. आजच्या पिढीला तो कळायला हवा.

- अमोल पालेकर, ज्येष्ठ अभिनेते

‘कई बार यू ही देखा है’ हे माझे आवडते गाणे आहे आणि नावडतेही... कारण या गाण्याने माझे वडील मुकेश यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. मात्र, पुरस्कार घेण्यासाठी ते हयात नव्हते. अजूनही मनाला वेदना होतात.

- नितीन मुकेश, ज्येष्ठ पार्श्वगायक

बासू चॅटर्जींच्या ‘रजनीगंधा’ने ‘मिडल ऑफ द रोड’ सिनेमाची मुहूर्तमेढ रचली. एक धाडसी विचार समोर आणला.

- अनिरुद्ध भट्टाचार्य, लेखक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT