मुंबई

Bhiwandi Crime: अज्ञात चोरट्यांकडून दोन लाखांची चोरी; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

Latest Thane Crime: दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्या आहेत.

CD

Latest Bhiwandi News: दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी अज्ञातांच्या विरोधात दोन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

यातील पहिल्या घटनेत निसार अहमद कुदबुल्ला मोमीन यांच्या मालकीच्या नारायण कंपाऊंडमधील लूम कारखान्यात १७ ते २१ सप्टेंबर रोजीच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गोदामात प्रवेश करीत कारखान्यातील आठ लूमचे ताके, १६ लूमचे ड्राफपिन आणि १६ वनज असा एकूण ६९ हजार १८४ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत काल्हेर येथील सुपर मार्केटजवळील जे. के. वेअरहाउसिंग कॉम्प्लेक्समधील अमित योगेश शहा यांच्या मालकीच्या गोदामातून ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबरदरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे शटर उचकटून त्यावाटे आत प्रवेश केला.

गोदामातील अल्का ब्रँड किचन प्रोफाइल कंपनीचे पट्टी असलेले एक लाख ३० हजार रुपये किमतीचे ३०० कि. ग्रॅम वजनाचे १६ बॉक्स चोरून नेले आहेत. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North: काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार बदलला, मधुरीमाराजेंना उमेदवारी

Shivsena Candidate List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर! १५ जणांच्या नावांचा समावेश, दोन जागा मित्रपक्षांना; शायना एनसी यांना उमेदवारी

Pradip Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं बंड! शिवसेनेचा आदेश डावलून पत्नीचा अपक्ष अर्ज भरणार

Chetna Pagydyala : १६ वर्षीय चेतनाने मोडला मिताली राजचा विक्रम; १९७३ सालचा पराक्रमही उध्वस्त, संघाचा ऐतिहासिक विजय

Video Viral: ''शिंदेंनी फसवलं, उद्धव ठाकरेच आमच्यासाठी देव'' उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले; अन्नही सोडलं

SCROLL FOR NEXT