मुंबई

भटाळे तलावालगतच्या बेकायदा बांधकामावर हातोडा

CD

भटाळे तलावालगतच्या बेकायदा बांधकामावर हातोडा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ : कल्याणच्या दुर्गाडी किल्याच्या जवळ असलेल्या भटाळे तलावात भराव टाकण्यात आला आहे. तसेच, रस्त्याच्या शेजारील जागेवर केलेल्या अनधिकृत बांधकाम व तबेल्यांवर महापालिकेतर्फे शनिवारी (ता. २८) कारवाई करण्यात आली; मात्र कारवाई सुरू असताना स्थानिक नागरिकांनी घोषणाबाजी करत विरोध केला. त्यावेळी पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना ताब्यात घेत पुढे बेकायदा बांधकाम जेसीबीच्या साह्याने पाडत कारवाई केली.

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक भटाळे तलावात भराव टाकत तलावाशेजारी अनधिकृत बांधकामे आणि म्हशींचे तबेले उभारण्यात आले होते. त्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त प्रशांत बोरकर, तुषार सोनवणे, सोनम देशमुख यांसह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी गेले होते. त्यावेळी या कारवाईला काही नागरिकांनी विरोध केला, तसेच पोलिस आणि महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते; मात्र पोलिसांनी या नागरिकांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात पथकाने अनधिकृत बांधकामे, तबेले, टपऱ्यांवर कारवाई करत ही बांधकामे जमीनदोस्त केली.

मागील अनेक वर्षे अनधिकृत बांधकामाच्या गर्तेत अडकलेला ऐतिहासिक तलाव मोकळा श्वास घेणार आहे. रस्त्याला अडथळा ठरणारी ही बांधकामे निष्कासित केली असून या तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
-प्रसाद बोरकर, उपायुक्त, कल्याण-डोंबिवली पालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Politics : भाजप, काँग्रेस हे पक्ष बिहारचे खरे गुन्हेगार... प्रशांत किशोर यांचा घणाघात; नितीश कुमारांवरही साधला निशाणा

Musheer Khan: गंभीर अपघातानंतर भारतीय क्रिकेटर मुशीर खानने वडिलांसह पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; जाणून घ्या काय म्हणाला

Assembly Elections: ठाकरे गट उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार? बड्या नेत्याने दिवसच सांगितला! काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates: पुतळा उभारण्यातही तुम्ही पैसे खाल्ले आहेत - ठाकरे

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन! सायबर गुन्हेगारांचे फसवणुकीचे ‘हे’ 10 फंडे; सोशल मीडियावरील बंद असलेले खाते डिलीट करण्याचाही सल्ला

SCROLL FOR NEXT