mumbai murder esakal
मुंबई

Mumbai Murder: मुलाचा ताबा मिळाला नाही.. पत्नीची भररस्त्यात गळा चिरून केली हत्या, मिरारोड येथील धक्कादायक घटना

Mumbai Crime News: पोलिसांनी अमरीन यांना वेळीच सहकार्य केले असते, तर त्यांची हत्या झाली नसती, असा आरोप येवले यांनी केला आहे.

CD

भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : मुलाचा ताबा घेण्यावरून झालेल्या वादात पतीने आपल्या पत्नीची भररस्त्यात गळा चिरून हत्या केल्याची घटना मिरारोडच्या नयानगर भागात आज घडली. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही घटना नयानगर पोलिस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर घडली. हत्या होण्याआधी ही महिला पोलिस ठाण्यातही येऊन गेली होती.

नदीम खान व अमरीन खान यांच्यात गेल्या दीड वर्षापासून कौटुंबिक वाद सुरू होते व याप्रकरणी अमरीन यांनी ठाणे न्यायालयात धावदेखील घेतली होती. या दोघांना दोन वर्षांचा मुलगा व एक बारा वर्षांची मुलगी आहे. न्यायालयात अमरीन यांनी आपल्या मुलाचा पतीकडून ताबा मिळावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार न्यायालयाने मुलाचा ताबा देण्याचे आदेश ऑगस्ट महिन्यात दिले, मात्र त्यानंतरही नदीम याने मुलाचा ताबा दिला नव्हता. त्यामुळे अमरीन यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. त्या वेळी न्यायालयाने पोलिस संरक्षणात मुलाचा ताबा द्यावा, असे आदेश दिले.

त्यानंतर त्यांना मुलाचा ताबा घेण्यासाठी गुरुवारी पोलिस संरक्षण देण्यात आले व अमरीन या नदीम खान याच्या घरी गेल्या, मात्र मुलगा अजमेरला गेला असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना मुलाचा ताबा मिळू शकला नाही.

आज (ता. ११) सकाळी अमरीन या आपल्या मुलीला भेटण्यासाठी नयानगरमधील शाळेत जात होत्या. त्या वेळी पाळतीवर असलेला पती नदीम खान याने त्यांना रस्त्यातच गाठले. त्या ठिकाणी त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. या वादातच नदीमने सोबत आणलेल्या चाकूने अमरीन यांच्या गळ्यावर वार करून जबर जखमी केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नदीमला ताब्यात घेतले व त्याच्याकडचा चाकू हस्तगत केला. जखमी अमरीन यांना जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.

पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप

मुलीला भेटायला जायच्या आधी अमरीन पुन्हा एकदा नयानगर पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. त्या वेळी त्यांची भेट सामजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश येवले यांच्याशी झाली. त्या वेळी पोलिसांकडून सहकार्य केले जात नसल्याचे त्यांनी येवले यांना सांगितले. पोलिसांनी अमरीन यांना वेळीच सहकार्य केले असते, तर त्यांची हत्या झाली नसती, असा आरोप येवले यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार! 'वर्षा' निवासस्थानातून मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Trending News: ओला स्कूटरमध्ये झाला बिघाड, दुरुस्तीसाठी लागले 90 हजार, तरुणाने हातोड्यानेच फोडली स्कूटर, पहा व्हिडिओ

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Latest Maharashtra News Updates : कोकण कधीच ठाकरेंचं नव्हतं- निलेश राणे

SCROLL FOR NEXT