ठाणे, ता. १२ : महायुती सरकारने मागील दोन वर्षांत केलेली विकासकामे, तसेच लेक लाडकी, लाडकी बहीणसारख्या योजना चालू ठेवायच्या असतील तर जागरूक राहावे लागणार आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच, पुन्हा महायुतीचे सरकार निवडून आणावे लागेल, असे आवाहनदेखील शिंदे यांनी यावेळी केले.
ठाण्यातील टीपटॉप प्लाझा येथे कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या अखत्यारीतील २७ गावांतील ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांचा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. सरकार चालवण्यासाठी घरात बसून नव्हे, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करावे लागत असल्याचे म्हटले. आगामी विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ यांच्या समोरचेच बटण दाबा, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, यानंतर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन घाट, उपवन तलाव, मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटल नळ पाडा, कासारवडवली तलाव, श्रीराम मंदिराजवळ, घोडबंदर रोड, मोघर पाडा तलाव तसेच धर्मवीर आनंद दिघे वाचनालय आणि अभ्यासिका कशिश पार्क, मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे ज्येष्ठांचे नंदनवन, हाजुरी, मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या इमारतीचा विस्तार आदी कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.