Latest Thane news: महायुतीकडून भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे गेल्याने भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख संतोष शेट्टी यांनी मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. याठिकाणी धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने येथील निवडणूक नेहमी चुरशीची झाली आहे.
२०१९च्या निवडणुकीत अवघ्या १७ दिवस प्रचार करून समाजवादी पार्टीचे रईस शेख यांनी शिवसेनेचे रुपेश म्हात्रे यांचा अवघ्या १,३१४ मतांनी पराभव केला. त्यावेळी काँग्रेसकडून निवडणूक लढवलेले संतोष शेट्टी हे तिसऱ्या क्रमांकावर होते. तत्पूर्वी २०१४ मध्ये शिवसेना उमेदवार रुपेश म्हात्रे यांनी भाजप उमेदवार असलेले संतोष शेट्टी यांचा ३,३९३ मतांनी पराभव केला होता.
२०१९ मधील पराभवानंतर संतोष शेट्टी यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून मागील चार वर्षे या मतदारसंघात काम करीत मोर्चेबांधणी केली. यासाठी स्वतंत्र अशा वॉर रूमची निर्मिती करून तेथून प्रत्येक मतदारांशी संपर्क आणि संवाद ठेवण्याचा प्रयत्न संतोष शेट्टी यांनी केला.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात २०१९च्या निवडणुकीत शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याने या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने दावा केला; परंतु त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नसल्याने भाजप आणि शिंदे गटात झालेल्या तडजोडीनंतर संतोष शेट्टी यांनी शुक्रवारी (ता. २५) रात्री उशिरा मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, मदनबुवा नाईक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.