Latest Political News: बोईसरमध्ये अमली पदार्थ वाहतूक करणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान चार लाखांचे मेथ्याक्वालोन हे अमली पदार्थ, मोबाईल आणि कार मिळून दहा लाख ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोईसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांना मंगळवारी (ता. ५) सकाळी अमली पदार्थाच्या वाहतुकीबाबतची माहिती मिळाली होती. सहाय्यक फौजदार हसकर, चंद्रकांत केंद्रे, पोलिस नाईक गोरखनाथ वाघ, गोरखनाथ चव्हाण आणि अजय मोरे यांच्यासह दुपारी एक वाजल्यापासून बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खैराफाटक कोस्टल चेक पोस्ट येथे नाकाबंदी लावली होती.
या वेळी संशयित कार (एमएच ४८ बीएच १४३९)ची तपासणी केली असता तीन प्रवाशांकडे चाळीस ग्रॅम वजनाची मेथ्याक्वालोन पावडर सापडली. चार लाखांचा हा अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्यामुळे संग्रामसिंह राजदेवसिंह राजपूत (वय ४२, रा. संजान, ता. जि. वलसाड, गुजरात) आणि नितेश महेश अग्रवाल (वय ३९, रा. गोरेगाव, मुंबई) यांना ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेला अमली पदार्थ गुजरातमधील वलसाड येथील मोहमंद सलमानअली रफाई यांच्याकडून आणल्याचे तपासात समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.