cash  sakal
मुंबई

Navi Mumbai: पोलिसांनी टाकला रो हाऊसमध्ये छापा, २ कोटी ६६ लाख केले जप्त

Latest Police News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

CD

Navi Mumbai: नेरुळ पोलिसांनी सेक्टर १६ मधील एका रो हाऊसवर सोमवारी सायंकाळी छापा मारून तब्बल २ कोटी ६६ लाख ७१ हजाराची रोख जप्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक आयोगाकडून लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

नेरुळ सेक्टर -१६ मधील एका रो हाऊसमधील इंद्रपाल यादव याच्या घरामध्ये बेकायदेशीर रोकड असल्याची माहिती नेरूळ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोमवारी सायंकाळी घराची झडती घेण्यात आली.

यावेळी घरामध्ये २ कोटी ६६ लाख ७१ हजारांचा बेकायदेशीर रोकड सापडली. इंद्रपाल यादव यांनी पैशांबाबत दिलेली माहिती विसंगत असल्याने पोलिसांनी याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला दिली. तसेच इंद्रपाल यादवला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT