सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेचा कौल असल्याने स्पष्ट बहुमतासह काँग्रेस-महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे आमदार कठीण परिस्थितीही पक्षासोबत राहिले आहे. त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.
शनिवारी निवडणुकांचे निकाल लागणार आहे. निकालानंतरच्या नियोजनासाठी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला शुक्रवारी मुंबईत आले आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनता काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. विधानसभेला जास्त मतदान झाल्याचा फायदा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याने त्रिशंकू विधानसभेचा प्रश्न उद्भवत नाही, असा दावाही केला.
----------------------------------------
मुख्यमंत्रिपदावरून वाद नाही
मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद नाही, निकालानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील, असेही चेन्नीथला यांनी स्पष्ट केले. गुरुवारी याच विषयावरून नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाद उफाळला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.