मुंबई

‘अफलातून’ डिटेक्टिव्हगिरीची धमाल !

CD

पुणे, ता. १८ ः जी गोष्ट आपल्याकडे नाही, ती आपल्याला हवीशी वाटणं साहजिक आहे, पण त्याची खंत न बाळगता नसलेल्या गोष्टीला आपली ताकद बनवून तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्र एका प्रकरणाचा छडा कसा मजेशीर प्रकारे लावतात याची धमाल दाखवणारा ‘अफलातून’ हा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी (ता. २१) प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

साहा अँड सन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पटकथा यांनी ‘अफलातून’ चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. ‘पेइंग गेस्ट’, ‘धमाल’, ‘ऑल द बेस्ट’, ‘पोस्टरबॅाईज’, ‘टोटल धमाल’ या हिंदी चित्रपटांच्या लेखनाबरोबरच टीव्ही मालिका, नाटकांसाठी लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन करणाऱ्या परितोष पेंटर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, जेसी लिव्हर, विष्णू मेहरा, रेशम टिपणीस अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आहे. ‘अफलातून’च्या टीमने ‘सकाळ’ कार्यालयाला नुकतीच भेट देत संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला.

श्री, आदि आणि मानव या तीन डिटेक्टिव्ह मित्रांची ही गोष्ट असून त्यातील एकाला बघता येत नाही, दुसऱ्याला ऐकू येत नाही, तर तिसरा बोलू शकत नाही. फसवणूक झालेल्या मारियाला मदत करण्याचा विडा हे तिघे उचलतात. हे प्रकरण हाताळताना अनेकदा गुंतागुंत उद्‍भवते व यातून बाहेर पडताना या तिघांची होणारी त्रेधातिरपीट खुबीने दाखवली आहे.
‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत. छायांकन सुरेश देशमाने; तर संकलन सर्वेश परब याचे आहे. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचा स्वरसाज लाभला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT