मुंबई

एसआयआयएलसी

CD

प्रमाणपत्र नसलेल्या एजंटांवर महारेराचा कारवाईचा बडगा

प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रियल इस्टेट एजंटांवर धडक कारवाई करत तब्बल २० हजार एजंटांची नोंदणी महारेराने नुकतीच रद्द केली आहे. महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण हे दोन्ही बंद केले आहे. यापुढे एजंटांकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल, तरच नवीन नोंदणी करता येईल; अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटांकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही, त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाईन व ऑफलाईन बॅच येत्या सोमवारी (ता. १५) सुरू होत आहे.
संपर्क : ७३५०००१६०३, ८९५६३४४४७५.


विदेशी भाजीपाला लागवड कार्यशाळा
वाढती शहरी लोकसंख्या, त्यांची बदलती जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि परदेशी पर्यटकांची रोजची वाढती संख्या यामुळे भारतात विदेशी भाजीपाला लागवडीला भरपूर वाव आहे. यासंदर्भात मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवारी (ता. १३) होणार आहे. विदेशी भाज्यांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्याची आणि भाजीपाला बाजारपेठेत यशस्वी होण्याची संधी कार्यशाळेद्वारे प्राप्त होणार आहे. पीक निवडीपासून काढणीनंतरच्या व्यवस्थापनापर्यंत विदेशी भाजीपाला उत्पादन तंत्रावर प्रभुत्व कसे मिळवावे, विदेशी भाज्यांची प्रभावीपणे जाहिरात आणि विक्री करण्यासाठी मार्केटिंग कसे करावे, विदेशी भाजीपाल्याच्या जाती, लागवडीचे तंत्र आणि काढणीनंतरची हाताळणी, स्थानिक आणि प्रादेशिक बाजारपेठांमध्ये विदेशी भाज्या ठेवण्यासाठी आणि विकण्यासाठी प्रभावी मार्केटिंग आदी बाबींबद्दल कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९१४६०३८०३१, ८९५६३४४४७२.

वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून, त्यांचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT