मुंबई

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद


पुणे, ता. १२ : दिग्गज संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाला संपूर्ण राज्यभरातून रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रसिकांचे कौतुकाचे शब्द, त्यांचे सातत्याने येणारे फोन आणि विविध माध्यमांतून होणाऱ्या शुभेच्छांच्या वर्षावाने आम्ही भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया चित्रपटाच्या चमूने व्यक्त केली आहे.
चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणाले, ‘‘चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रसिकांकडून सातत्याने कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक रसिकांनी चित्रपट एकदा नाही, तर अनेक वेळा आणि सहकुटुंब पाहिला आहे. बाबूजींचा संघर्ष, ग. दि. माडगूळकर आणि बाबूजींची मैत्री, ललिताबाई फडके यांची मिळालेली साथ, श्रीधर फडके यांनी चालवलेला वारसा, अशा भोसले यांची गाणी या सगळ्या गोष्टी रसिकांना भावल्या आहेत. बाबूजींची राष्ट्रभक्तीची बाजू पाहून अनेक रसिक भारावून गेले आहेत. अनेक चित्रपटगृहांमध्ये चित्रपट संपल्यानंतर रसिक आनंदाश्रूंसह आम्हाला भेटतात, याचे समाधान आहे.’’
माधुरी दीक्षित, सचिन व सुप्रिया पिळगावकर यांसारख्या चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनीदेखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. ‘‘या चित्रपटात सुधीर फडके यांचा जीवनप्रवास मांडताना प्रसंगानुरूप बाबूजींच्याच अजरामर गाण्यांचा सुरेख मेळ आम्ही साधला आहे. ही मूळ गाणी ऐकताना अंगावर काटा येत असल्याच्या प्रतिक्रियाही रसिकांनी व्यक्त केल्या. मध्यंतरात कोणालाही बाहेर जाऊन खाण्यापिण्याची आठवण येत नाही. हेच आमचे खरे यश आहे,’’ अशी भावनाही देशपांडे यांनी व्यक्त केली. ज्या रसिकांनी अद्याप हा चित्रपट पाहिला नाही, त्यांनी लवकरात लवकर हा सुमधुर चित्रपट अनुभवावा, असे आवाहन योगेश देशपांडे व सौरभ गाडगीळ यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

Salman khan Whatsapp Threat: "...तर सिद्दीकींपेक्षा वाईट हाल करू," सलमान खानला पुन्हा धमकी; व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये नक्की काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : शिल्पकारानंतर पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या UP च्या वेल्डरला अटक

ISSF World Cup 2024: विवानला रौप्य, तर अनंतजीतला ब्राँझ; भारत चार पदकांसह नवव्या स्थानी

SCROLL FOR NEXT