मुंबई

राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षापदी उमा मुंढे यांची निवड

CD

रसायनी, ता. ३१ (बातमीदार) : वासांबे मोहोपाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण माजी सभापती उमा मुंढे यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षापदी निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित होत्या.
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुरुवातीला उमा मुंढे एक वेळा सदस्या म्हणून निवडून आल्या आहेत. त्यानंतर वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सलग दोन वेळा निवडून आल्या. दुसर्‍यांदा निवडून आल्यावर अडीच वर्षे महिला आणि बाल कल्याण सभापतीची त्यांनी धुरा सांभाळली आहे. राष्ट्रवादीत फुटीनंतर अजित पवार गटाने त्यांच्याकडे रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय रायगड जिल्हा समितीवर नामनिर्देशित सदस्यपदी त्यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांचे जिल्हा परिषद माजी सदस्या पद्मा पाटील, कार्यकर्ते कैलास म्हात्रे, संदीप मुंढे, अनिल पिंगळे, सुरेश पाटील, अविनाश पाटील, नंदकुमार पाटील, वर्षा पाटील, दिव्या जांभळे, रेश्मा चौधरी आदींनी अभिनंदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT