banana esakal
मुंबई

Alibag Banana News : केळीच्या खोडापासून बनवली ‘दोरी’

CD

Banana News: बांधकामाच्या ठिकाणी सुंभाची दोरी वापरली जायची, पण मागील काही वर्षात नायलॉनचा वापर वाढल्‍याने सुंभाच्या वापर घटला आहे. चौलमधील पर्यावरणप्रेमी शैलेश राईलकर यांनी केळीच्या खोडापासून घरच्या घरी पर्यावरण पूरक ‘दोरी’बनवली आहे.

केळीच्या खोडापासून सुंदर असे रेशमी धागे बनतात. यापासून अनेक कलात्मक वस्तूही बनवल्या जातात. कोकणात बहुतांश शेतकरी, बागायतदारांच्या परसबागेत दोन चार केळीची झाडे असतातच. खोडापासून दोरी बनवायला कोणतीही यंत्रसामग्री लागत नाही, शिवाय तीन पर्यावरणपूरक असल्याने तिच्या वापराने निसर्गाला बाधाही पोहोचत नाही. जाड सुंभाप्रमाणे केळीच्या खोडापासून दोर बनवणे शक्य आहे. याचा उपयोग घरगुती वापरासाठी, शेतकरी गोणी बांधण्यासाठी, भारे बांधण्यासाठी करू शकतात.


केळीचे खोड कापून आतील पापुद्रे वेगळे केले जातात, त्यावर अवजड वस्तूंने दाब देऊन आतील रस काढला जातो. हा रस बागेतील झाडांच्या मुळाशी टाकल्‍यास वाढीस पोषक असतो. राईलकर यांनी केळीच्या पापुद्र्यामधील रस काढल्यावर राहिलेला पट्टा दोरीवर टांगून पुढे आठवडाभर वाळत टाकायच्या, नंतर सुकलेल्या पट्ट्यांची वेणी घालून सुंभासारखी दोरी तयार केली जाते.

केळीपासून धागा निर्मितीचा व्यवसाय
कोकणातून अनेक युवक नोकरीच्या शोधात शहराकडे वळत आहेत. अशा वेळी कल्पकता दाखवून केळी धागा निर्मितीचा व्यवसाय केला तर गावातच रोजगार मिळेल. तसेच प्लास्‍टिक तसेच नायलॉनच्या दोरीचा वापर कमी होईल. प्रवासाला जाताना केळीची पाने खाद्यपदार्थ बांधण्याचीही पूर्वी पद्धत होती. त्‍यामुळे प्लास्टिक आपोआप कमी होईल.

प्रायोगिक तत्त्वावर केळीच्या पानापासून दोरी तयार करण्यास सुरुवात केली आहे. या कुठेही वीज किंवा कुठल्याही यंत्राचा वापर केलेला नाही. मध्यम केळीच्या खोडापासून चार ते पाच फुटी दोरी तयार होते. विविध पालेभाज्यांच्या जुड्या, पडवळाच्या भाजीचे भारे, पेंढ्याचा छोटा भारा, भाज्यांच्या गोणीची तोंडे बांधण्यासाठी त्‍याचा वापर होतो. भविष्यात मोठ्या खोडापासून दहा फूट लांबीचा दोर बनवायचा मानस आहे. हा प्रयोग पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.
- शैलेश राईलकर, बागायतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT