मुंबई

रिक्षाचालकांसाठी क्यूआर कोडची सुविधा

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : आपल्या देशाने अत्यंत कमी वेळात डिजिटल क्रांती घडवली आहे. याच अनुषंगाने डोंबिवली नागरी सहकारी बँक आणि डोंबिवली रिक्षाचालक- मालक संघटना एकत्र येत डोंबिवलीतील रिक्षचालकांना ‘डिजिटली सुसज्ज’ करण्याचा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने रविवारी (ता. १२) आयोजित मेळाव्यात रिक्षाचालकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सुमारे ५० हून अधिक चालकांनी याचा लाभ घेतला. डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा गांधी चौकात क्यूआर कोड मेळाव्‍याचे आयोजन केले होते. यावेळी बँकेचे संचालक योगेश वाळुंजकर, सरव्यवस्थापक रमेश सिंग, रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष संजय देसले, कार्याध्यक्ष प्रमोद गुरव, सरचिटणीस, जिल्हा वाहतूक अध्यक्ष दत्ता माळेकर उपस्थित होते.

रिक्षाचालकांनी क्यूआर कोडद्वारे पैसे स्वीकारण्यास सुरुवात केल्यास ते थेट बँकींग प्रवाहात सामील होणार आहेत. त्यामुळे त्यांची पत सुधारण्यास निश्चितच मदत होणार आहे, असे प्रतिपादन डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे संचालक मिलिंद आरोलकर यांनी केले. डोंबिवली नागरी सहकारी बँक व डोंबिवली रिक्षाचालक-मालक संघटनेच्या वतीने योजलेल्या क्यूआर कोड मेळाव्यात ते बोलत होते. सामान्यांतील सामान्य समाजघटकही बँकींग प्रवाहात सहभागी व्हावा, हा उद्देश सफल झाल्यास त्याचा उपयोग संपूर्ण कुटुंबाला होणार आहे, असेही आरोलकर म्हणाले. या सुविधेमुळे रोजच्या मिळकतीवर, दैनंदिन खर्च भागविणाऱ्या रिक्षाचालकांना सोयीचे होणार आहे. शिवाय दैनंदिन व्यवहाराचा चोख हिशोब राहिल्यामुळे भविष्यात जेव्हा कर्ज घेण्याची वेळ येईल, तेव्हा याचा फायदा रिक्षाचालकांना मिळणार आहे, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT