मुंबई

रणरणत्या उन्हात कार्यकर्त्यांचा उत्साह

CD

रणरणत्या उन्हात कार्यकर्त्यांचा उत्साह
मोदींच्या सभेसाठी गर्दी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : आग ओकणारा सूर्य, रणरणते ऊन, घामाच्या धारांनी हैराण झालेले असतानाही भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने कल्याणमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेला उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये महिला, पुरुषांचा सर्वाधिक सहभाग दिसून आला. गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. सभेच्या वेळी नागरिक जय श्रीरामाचा नारा देत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी कल्याणमध्ये दुपारी एक वाजल्यापासूनच सभेच्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ सुरू झाली होती. रणरणत्या उन्हातदेखील नागरिक महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी सभेच्या ठिकाणी येत होते. कल्याण व भिवंडी मतदारसंघातील शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण, शहरी भागातील सामान्य महिला, पुरुष नागरिकांना ‘बांधिव’ कार्यकर्ते म्हणून विशेष बस उपलब्ध करून सभास्थळी आणले गेले.

मोदी यांची सभा तीन वाजता असल्याने १२ वाजल्यापासून नागरिक यायला सुरुवात झाली. सभा पाच वाजता होणार असल्याचे सांगण्यात आले. सभेला दोन तास उशीर होणार असल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. तरी नागरिक सभा मंडपात बसून वाट पाहात होते. रणरणत्या उन्हात प्रवास करून आलेल्या कार्यकर्त्यांना आच्छादित सभा मंडपामुळे काहीसा दिलासा मिळाला. मंडपात सर्वत्र पंखे, वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली होती. नाश्ता, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.

कल्याणला छावणीचे स्वरूप
सभेमुळे कल्याण शहर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. जागोजागी पोलिस जथ्थ्याने उभे होते. संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात होती. सुरक्षेचा त्रास नको, म्हणून कल्याणमधील बहुतांशी रिक्षाचालकांनी रिक्षा व्यवसाय बंद ठेवला. पंतप्रधान मोदी येणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा रस्तारोधक आणि या भागातील सर्व दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती. पक्की दुकाने, बांधकामे यांच्यावर हिरव्या जाळ्या लावून ती बंदिस्त करण्यात आली आहेत. मोदींच्या मार्गाच्या दुतर्फा एकही माणूस फिरकणार नाही, असे नियोजन करण्यात आले होते. सभेसाठी प्रशासनाने वितरित केलेल्या प्रवेश पासाशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीला सभेच्या ठिकाणी सोडले जात नव्हते. सभा मंडपाचा ५०० मीटरचा परिसर, रस्ते बांबूचे अडथळे, रस्तारोधक लावून बंद करण्यात आले होते. त्यामुळे सभा स्थळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांना, तसेच सभेच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना अर्ध्या वाटेत रिक्षा, वाहन सोडून मग पायी यावे लागत होते.

सेल्फी पॉईंटवर गर्दी
सभा मंडपाच्या बाजूला राम मंदिराची प्रतिकृती, तसेच पंतप्रधान मोदी यांची उभी प्रतिमा लावण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी जाऊन कार्यकर्ते राम मंदिराच्या प्रतिकृतीसोबत आणि मोदी यांच्या प्रतिमेसोबत स्वतःच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.


मोदी येताच घोषणांनी दणाणले सभामंडप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभेच्या ठिकाणी आगमन होताच ‘जय श्रीराम, जय श्रीराम, मोदीजी को जय श्रीराम’, ‘मोदी, मोदी’ असा जयघोष करण्यात आला. भारतमाता की जयचा जयजयकार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT