मुंबई

पेण येथे खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

CD

पेण येथे खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
वडखळ, ता. ११ (बातमीदार) : अखिल भारतीय आगरी समाजिक संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या २५ मे रोजी खुल्‍या वक्‍तृत्व स्‍पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता पेण येथील आगरी समाज सभागृहात आगरी समाजातील स्त्री-पुरुषांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये संस्थेने खालील सामाजिक विषय ठेवले आहेत. यामध्ये ‘आगरी समाजाच्या अधोगतीला असंघटितपणा कारणीभूत, आगरीबहूल इलाख्यातला विकास समाजाला शाप की वरदान, नोकरभरती स्थानिकांवर अन्याय : शासनकर्त्यांची उदासीनता की लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा, आजची तरुणाई भविष्याच्या विचारांपासून भरकटतेय, आगरी लोक परंपरा आणि लोकसंस्कृतीचा ऱ्हास’, यापैकी कोणत्याही एका विषयावर स्पर्धकाला आपले विचार मांडता येतील. स्पर्धकांनी वेळेत उपस्थित राहायचे आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम ठेवला जाणार आहे. विषय, आशय आणि सादरीकरण या निकषावर विजेत्याची निवड करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या पाच स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र अशी बक्षिसे देण्यात येतील. तरी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे १५ मे २०२४ पर्यंत आल्हाद पाटील- पनवेलसाठी ७०४५४४४१९७, नलिनी पाटील- ठाणे ९००४३५७६५०, कल्पना टेमकर- नागोठणे ९९७०८९३४७१, पी. वाय. पाटील- पेण ९४२२४९५३६२ यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT