मुंबई

टोलदरात वाढ, मुंबईच्या पाच एन्ट्री पॉईंटवर 1 ऑक्टोबरपासून वाढीव टोल भार

पूजा विचारे

मुंबईः  मुंबईच्या पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोलच्या दरात वाढ होणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून टोलच्या दरात वाढ होईल. ही वाढ 5 ते 25 रुपयांची असेल. मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर ही टोलवाढ लागू होणार आहे. या पाचही प्रवेशद्वारांवर एमईपी कंपनीचे टोलनाके आहेत.

वाढीव नवे दर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू असतील.  एमएमआर भागातील 55 उड्डाणपुलांच्या उभारणीच्या खर्च वसुलीसाठी 2002 ते 2027 या 25 वर्षांसाठी टोलवसुली करण्यात येणार आहे. महानगर प्रदेशातील 55 उड्डाणपुलांच्या उभारणीचा खर्च 2002 ते 2027 अशा 25 वर्षांत वसुलीसाठी हे टोलनाके  उभारण्यात आले. राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार टोलच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ होते.  त्यानुसार कार आणि जीपसारख्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी पाच रुपयांची वाढ होऊन टोल आता 40 रुपये होणारेय.  हलक्या वाहनांचा मासिक पासमध्येही 100 रुपयांची वाढ झाली आहे.  पाचही नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता 1400 रुपयांवरुन 1500 रुपये होणारेय. 

१ ऑक्टोबरपासून कार, जीपसारख्या हलक्या वाहनांच्या एकेरी प्रवास दरात पाच रुपयांची वाढ होऊन आता टोलचा दर 40 रुपये होईल. मिनी बस, 12 ते 20 प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मध्यम वाहनांच्या टोल दरात 10 रुपयांनी वाढ होऊन तो 65 रुपये होईल. ट्रक आणि बसच्या टोल दरात 105 वरून 130 अशी 25 रुपयांची वाढ झाली. अवजड वाहनांचा टोल 135 रुपयांवरून 160 रुपये असा वाढविण्यात आला आहे.

असे असतील टोलचे नवीन दर 

  • छोटी वाहनं - आधी 35 रुपये, आता 40 रुपये (5 रुपयांची वाढ)
  • मध्यम अवजड वाहनं - आधी 55 रुपये, आता 65 रुपये (10 रुपयांची वाढ)
  • ट्रक-बसेस - आधी 105 रुपये, आता 130 रुपये (25 रुपयांची वाढ)
  • अवजड वाहनं - आधी 135, आता 160 रुपये (25 रुपयांची वाढ)
  • हलक्या वाहनांचा मासिक पास - आधी 1400 रुपये, आता 1500 रुपये (100 रुपयांची वाढ)

Toll Rate Mumbai Entry Points Increase 5 to 25 from october 1

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT