मुंबई

येत्या वर्षात तुम्हाला पाहायला मिळतील 'या' युक्त्या, 'हे' वेगवेगळे प्रयोग..

सकाळ वृत्तसेवा

येत्या नवीन वर्षात नवनवीन युक्त्या, वेगवेगळे प्रयोग तुम्हाला पाहायला मिळतील. ऑफिसमध्ये दांडी मारणंही अवघड होईल. मोबाईल वापरावरही बंधनं येऊ शकतात, येत्या काळात अशा सुविधा उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळं या आयडीयाज नक्की कोणकोणत्या आहेत. संपूर्ण वाचा.  

  • बायोमेट्रीकच्या जागी फेसियल स्कॅनिंग

ऑफिसमध्ये हजेरी घेण्यासाठी आता फेस स्कॅन फेसिया या टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणाराय. बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावली जाते. पण, अंगठ्याचा ठसा तयार करून अनेक दांडीबहाद्दर कंपनीची फसवणूक करतात. त्यामुळं फेसिया म्हणजे आपला चेहरा स्कॅन करून हजेरी लावली जाणाराय.

सध्या अमेरिकेतील 17 एअरपोर्टवर ही सुविधा सुरू करण्यात आलीय. अमेरिकेत वरिष्ठ नागरिकांनी जर आपला चेहरा स्कॅन करून लॉगिन केलं तर त्यांना सरकारी सोयी सुविधांचा लाभ मिळतो. अशाच प्रकारे भारतातही सेवा उपलब्ध होऊ शकते.

  • स्ट्रीमिंग सर्विसमध्ये स्पर्धा वाढेल

स्ट्रीमिंग ऍप्स आणि साईट्स यामुळं घरबसल्या नवीन पिक्चर, वेब सीरिज, सीरियल्स, स्पोर्ट पाहू शकतो. सध्या तरी एमेझॉन, नेटफ्लिक्स, वूट, हॉटस्टार असे अनेक स्ट्रीमिंग ऍप्स आहेत. या ऍप्सवर लगेच आपण पिक्चर पाहू शकतो. पण, हे ऍप्स सध्या मार्केटमध्ये चांगलेच चालतायत. त्यामुळं अजून ऍपल, डिझनीचं ऍप येतंय. त्यामुळं स्ट्रीमिंग ऍप्सची स्पर्धा वाढणार आहे. ओरिजनल टीव्ही स्क्रिप्ट करायला 1990 च्या दशकात जितका खर्च केला गेला त्यापेक्षा जास्त खर्च 2020 मध्ये होईल. कारण आता ऑनलाईन ऍपद्वारे मोबाईल,टीव्हीवर सीरिज पाहता येणं शक्य होणार आहे. 

  • 2030 पर्यंत हवामानात बदल होणार

येणाऱ्या काही वर्षांत पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. हवामानात बदल होणार असून, आपल्याला काळजी घ्यावी लागेल. 2030 पर्यंत 184 देशांना हवामान बदलाचा फटका बसू शकतो. त्यामुळं झाडे लावून, पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे.

  • मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोला

आपण ज्या ठिकाणी काम करतोय तिथे आपल्याला मानसिक त्रास होत असेल तर उघडपणे बोलायला हवं. वर्ल्ड हेल्थ ऑरर्गनायझेशनच्या माहितीनुसार केवळ चिंतेमुळे, मानसिक त्रासामुळं दरवर्षी 1 ट्रिलियन डॉलर्स इतकं नुकसान कंपनीचं होतंय. मानसिक तणाव असेल तर आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करायला हवी. चर्चा केल्यानं प्रॉब्लेम सुटतात.

  • चार दिवस काम, तीन दिवस सुट्टी

जपानमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा वर्क वीकवरील प्रयोग करून पाहिलाय. चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी कर्मचाऱ्यांना देण्यात आलीय. पण, कर्मचाऱ्यांना अशी सुविधा दिल्यानंतर कर्मचारी काम कसं करतात, यावरही सध्या रिसर्च सुरू आहे. यामुळं चांगलं काम आणि कंपनीलाही जास्त फायदा होण्यास मदत होईल.

  • ऑफिसमध्ये मोबाईलवर जास्त वेळ 

ऑफिसमध्ये काम करत असताना दोन तृतियांश कर्मचारी जास्तीत जास्त वेळ फोन पाहण्यातच घालवतात. त्यामुळं कामात कमी आणि मोबाईलमध्ये जास्त वेळ जातो. यामुळं कामावर परिणाम होतो. 8 तासाच्या शिफ्टमध्ये एक तास मोबाईलवरच वेळ घालवत असल्याचं एका सर्व्हेत सिद्ध झालंय. मोबाईलवर जास्ती वेळ घालवत असल्याने कंपनीचा तोटा होतोय. यासाठी कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपाययोजना तयार केली जाणाराय.

  • काम करताना व्यायाम करायला हवा

ऑफिस कामामध्ये 8 ते 9 तासांची शिफ्ट ड्युटी असते. त्यामुळं कामाच्यावेळी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणून काम करत असताना शरीराची हालचाल व्हायला हवी. यासाठी कंपनीकडून व्यायामाचं प्रशिक्षण द्यायला हवं. बसून कोणते व्यायाम करता येतील, फावल्या वेळेत कोणते व्यायाम करणं शक्य आहे. यावरच चर्चा करून व्यायाम करायला हवेत. त्यामुळं कामासोबत आरोग्यही चांगलं राहिलं आणि याचा फायदा कंपनीलाही होईल.

  • कामामुळं पाणी पिण्याकडे दुर्लक्ष 

ऑफिसमध्ये काम करत असताना एका जागी बसल्याने उठायचा कंटाळा येतो. त्यामुळं कित्येकजण जागेवरून उठून पाणी प्यायचा कंटाळा करतात. पाणी कमी प्यायल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. मूतखड्यासारखा भयंकर आजारही होतो. त्यामुळं एकाच जागेवर बसून आळशीपणा न करता पाणी प्यायला हवं. यासाठी आपल्या मोबाईलमध्ये अलार्म लावून त्याची आठवण करू शकता.

  • मोबाईल सोडून मैदानी खेळांना महत्त्व

कामातून वेळ मिळत नसल्याने मैदानी खेळांकडे दुर्लक्ष झालंय. आधी मोबाईल नसल्याने मैदानी खेळ जास्त खेळले जायचे. पण, मोबाईलमुळं इंटरनेट उपलब्ध झाल्याने माणूस आळशी बनलाय. यामुळं मोबाईल लांब ठेवून दिवसातून कमीत कमी अर्धा तास तरी मैदानी खेळ खेळायला हवा. यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहिल.

  • व्यसनं नको आवडीच्या पदार्थांवर ताव मारा

व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेयत. यामुळं व्यसन करू नये. पण, व्यसन असलेल्या लोकांनी व्यसन सोडण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं कुटुंब उद्ध्वस्त होतंय. त्यामुळं व्यसन न करता आपल्या आवडीच्या पदार्थांवर जास्त भर द्यायला हवा.

WebTitle : top ten ideas which might change your future and lifestyle in coming year

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT